Sunday, 13 December 2020

कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव



०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.


०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.


०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.


०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले


No comments:

Post a Comment