Friday, 25 December 2020

जव्हारमध्ये १२ व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा


🎗शरपारख ते नाशिक व  शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांना मिळाले आहेत. जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे.


🎗परातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी १९८० च्या सुमारास जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या या जैववैविध्य समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचादेखील समावेश होता. जैववैविध्य आणि पुरातत्त्व असे दोन्ही विषय त्याच्या अभ्यासाचे असल्याने त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.


🎗‘‘हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले आहे. या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृतिबदलाचे पुरावेदेखील पुढे आले आहेत.

No comments:

Post a Comment