Saturday, 5 December 2020

युपीनंतर आता मध्य प्रदेश सरकार आणणार ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा

🔶उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारही जबरदस्तीनं धर्मांतरविरोधी (लव्ह जिहाद) कायदा आणणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याची घोषणा केली. उत्तर प्रदेशमध्ये नुकताच हा अध्यादेश लागू झाला असून त्याअंतर्गत एक अटकही झाली आहे.


🔶उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लग्नाच्या आमिषानं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल अनंदीबेन पटेल यांनी मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेनंतर हा अध्यादेश राज्यात लागू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका मुस्लिम तरुणाला हिंदू विद्यार्थीनीचं लग्नासाठी धर्मांतर घडवून आणण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अशा कायद्यांतर्गत ही देशातील पहिलीच अटक ठरली.


🔶तयानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील अशा कायद्यावर विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे.


🔶यावरुन भाजपाशासित राज्यांनी अशा कायद्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. लग्नासाठी धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकाराला भाजपाने ‘लव्ह जिहाद’ असं म्हटलं आहे. हा प्रकार गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो ऱोखायला हवा, या विचारातून भाजपाशासित राज्यांमध्ये याविरोधात कायदे तयार होत आहेत.

No comments:

Post a Comment