Monday 6 March 2023

वित्त आयोग

*◾️सथापना* : 

वित्त आयोगाची स्थापना आजपासून ६७ वर्षांपूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पदाधिकारी कायदा मंत्री यांनी मिळून केली. भारत सरकारच्या अधिपत्याखाली या आयोगाचे कार्यक्षेत्र कार्य करते. वित्त आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

 

*⚫️रचना* :

 वित्त आयोग ५ लोकांचे मिळून बनते. त्यापैकी एक अध्यक्ष असतो व इतर चार सदस्य असतात. चार सदस्यांपैकी दोन सदस्य हे पूर्ण-वेळ सदस्य असतात. उरलेले दोन सदस्य अर्ध-वेळ सदस्य असतात.

  

🔺*नियुक्ती* :

 वित्त आयोग व त्यातील सदस्यांची नियुक्ती ही भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींमार्फत कलम २८० नुसार केली जाते. 


*🔻पात्रता* :

 वित्त आयोगाचा अध्यक्ष म्हणून असा व्यक्ती निवडला जातो ज्याला लोकांच्या आर्थिक समस्या व गरज याबद्दल सखोल ज्ञान असते. (उदाहरणार्थ निवृत्त आय.ए.एस.अधिकारी). इतर चार सदस्यांपैकी एक सदस्य उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असलेला नियुक्त करतात. तर दुसरा जयला सरकारी वित्त व खाती याबद्दल संपूर्ण ज्ञान आहे असा व्यक्ती नेमला जातो. तिसरा व्यक्ती ज्याला प्रशासनाबद्दल पूर्ण माहिती आणि वित्तीय तज्ज्ञ असला पाहिजे व चौथा सदस्य अर्थतज्ज्ञ असला पाहिजे. 


*◾️कालावधी* :

 वित्त आयोगाचा कालावधी हा साधारणपणे पाच वर्षांचा असतो. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा त्यापूर्वी(गरज असेल तर) राष्ट्रपती नवीन वित्त आयोग(नवीन सदस्य) नेमू शकतात. 


*♻️कार्य* :

१) करातून वसूल झालेला निधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये समप्रमाणात विभागणे. 

२) राज्यांना लागणाऱ्या निधीसाठी कारणीभूत घटक व त्याचे परिणाम शोधून निश्चित करणे. 

३) जमा झालेल्या निधीतून ज्या राज्यांना आवश्यकता आहे अशा राज्यांना निधीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणे. 

४) वित्त अहवाल राष्ट्रपतींपुढे सादर करून त्यावर चर्चा करून अव्सज्याक सूचना सूचित करणे. 

५) आर्थिकदृष्ट्या मागास व सधन राज्य यांच्यातील वित्तीय दरी कमी करून त्यांना एकसमान बनवण्याचा प्रयत्न करणे. 



*🔺आतापर्यंतचे वित्त आयोग व अध्यक्ष* :


१) पहिला वित्त आयोग(१९५१ साली स्थापना) - के.सी.नियोगी 

२) दुसरा (१९५६) - के.संथानम 

३) तिसरा(१९६०) - ए.के.चंदा 

४) चौथा(१९६४) - पी.व्ही.राजमन्नावर 

५) पाचवा(१९६८) - महावीर त्यागी 

६) सहावा(१९७२) - के.ब्रम्हानंद रेड्डी 

७) सातवा(१९७७) - जे.एम.शेलार 

८) आठवा(१९८३) - यशवंतराव चव्हाण 

९) नववा(१९८७) - एन.पी.के.साळवे 

१०) दहावा(१९९२) - के.सी.पंत 

११) अकरावा(१९९८) - ए.एम.खुश्रो 

१२) बारावा(२००२) - सी.रंगराजन 

१३) तेरावा(२००७) - विजय केळकर 

१४) चौदावा(२०१३) - आयव्ही.व्ही.रेड्डी 

१५) पंधरावा(२०१७) - एन.के.सिंग 



*🔘पधराव्या वित्त आयोगाबद्दल* :

अध्यक्ष - एन.के.सिंग(I.A.S.)

पूर्ण-वेळ सदस्य:- १) शक्तिकांत दास, २)अनुप सिंग, 

अर्ध-वेळ सदस्य:-१)रमेश चांद २)अशोक लहरी


No comments:

Post a Comment