🔰करोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना, गूगल या सर्च इंजिनवर जास्तीतजास्त लोकांनी याच शब्दाचा शोध घेतला असावा असे कुणालाही वाटणे साहजिक आहे. मात्र, शोधविषयाच्या बाबतीत इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) करोना विषाणूवरही मात केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या गूगल इंडियाच्या ‘सर्च इन २०२०’मुळे उघड झाले आहे. यामुळे भारताचे क्रिकेटप्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
🔰गल्या वर्षी ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप’ ही गूगल सर्चवरील ‘टॉप ट्रेंडिंग क्वेरी’ होती.
🔰करीडा आणि वृत्त कार्यक्रमांपैकी आयपीएलचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. यानंतर करोना विषाणू, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, बिहार निवडणूक निकाल आणि दिल्ली निवडणूक निकाल याचा गूगलवर सर्वात जास्त शोध घेण्यात आलेल्या विषयांमध्ये समावेश आहे.
🔰कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आयपीएलची तेरावी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातींमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा तिच्या प्रेक्षकसंख्येत या वर्षी २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.
No comments:
Post a Comment