०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.
०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.
०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.
०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.
०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.
०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.
No comments:
Post a Comment