Tuesday, 16 April 2024

प्रार्थना समाज



*प्रार्थना समाज स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना झाली होती.

*दादोबा पांडुरंग भाऊ महाजन आत्माराम पांडुरंग समाजसुधारकांनी एकत्र येऊन 31जुलै 1849 रोजी मुंबईत परमहंस सभा या संघटनेची स्थापना केली.


*दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी मानव धर्म सभा नावाची एक संघटना स्थापन केली होती, परंतु मानव धर्म सभा फार काळ टिकली नसल्यामुळे दादोबा पांडुरंग यांनी काही मित्रांच्या सहकार्याने परमहंस सभा ही नवीन संघटना स्थापन केली होती.


*परमहंस सभेची तत्वे बरीचशी ब्राह्मो समाजाच्या तत्वां सारखी होती.


*परमहंस सभेच्या विचारावर ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची ही छाप होती.


*परमहंस सभेच्या सभासदांनी संघटनेच्या कामकाजाविषयी गुप्तता राखण्याचे धोरण अवलंबिले होते.


*लोकांच्या भीतीने परमहंस सभा 1860 मध्ये बंद पडली.


*1864 मध्ये ब्राम्हण समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले होते, त्यांच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना काही समाजसुधारकांनी मुंबईत केली.


*प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता.


* प्रार्थना समाजाची तत्वे *

1. ईश्वर एकच असून तो निराकार आहे तोच या विश्वाचा निर्माता आहे

2.सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग होत, या मार्गाचा मनुष्याने अवलंब केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रार्थनेच्या मार्गाने ही ईश्वराची उपासना करता येते परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक फलाची प्राप्ती होत नाही.

प्रार्थना भौतिक फलांच्या प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त आत्मिक उन्नती साठी करायची आहे.

3. मूर्तिपूजा हा परमेश्वराचा उपासनेचा अतिशय हीन मार्ग आहे.

4. मूर्तिपूजा ईश्वरास अवमानकारक असते. तसेच हा मार्ग मनुष्यासही नीचपणा आणणारा आहे.

5. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे.

6. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती किंवा उपासना करावी.

* वरील प्रार्थना समाजाची तत्वे होय.


* प्रार्थना समाज जरी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून निर्माण झाला तरीसुद्धा प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे विचारांमध्ये थोडा फरक होता.

* जसे की ब्राह्मो समाजाची हिंदू धर्मापासून बाजूला होऊन आपला वेगळा धर्मपंथ निर्माण करण्याची भूमिका पार्थना समाजाला कधीही मान्य झाली नाही.

* प्रार्थना समाजाची एक कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी " डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया" नावाची संस्था अस्पृश्यांच्या कल्याणासाठी स्थापन केली.

* ना. म. जोशी यांनी "सोशल सर्विस लीग" या संघटनेची स्थापना करून मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment