Monday, 1 April 2024

ग्रहाचे वर्गीकरण


√ लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे दोन वर्ग केले आहे.


१) अंतर्ग्रह

२) बहिर्ग्रह


√ १) अंतर्ग्रह : 


◆ सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा, याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. 


◆ बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.


◆ बुध व शुक्र या दोन्ही ग्रहांचे कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत येत असल्याने त्यांना कक्षान्तर्गत ग्रह असेही म्हणतात.


√ २) बहिर्ग्रह : 


◆लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. यांत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. सर्व ग्रहांना खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे व त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.


 ●●ग्रहांची वैशिष्ट्ये●●


१) बुध : 


√ सूर्याला सर्वात जवळचा ग्रह.

√ आकारमानाने सर्वात लहान ग्रह. 

√ सर्वात हलका व सर्वात उष्ण ग्रह.

√ सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह.

√ सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास ८८ दिवस लागतात. 

√बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही.


२) शुक्र (Venus) : 


√ सर्वात तेजस्वी ग्रह.

√ कृष्ण पक्षात रात्री त्यापासून प्रकाश मिळतो.

√ पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.

√ शुक्र हा जवळ-जवळ सर्व बाबतीत पृथ्वीसारखाच आहे म्हणून याला पृथ्वीची बहिण म्हणतात.

√ सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतांना स्वत:भोवती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. 

√ अपवाद शुक्र आणि यूरेनस मात्र स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात.

√ चंद्राप्रमाणे शुक्राच्यादेखील कला दिसतात.

√ शुक्रावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेला असल्याने त्याला “ढगांच्या आड लपलेला शुक्र' असेही म्हणतात.

√ शुक्र ग्रहावर दिवस आणि रात्रीचे तापमान सारखेच असते.

√ शुक्राला उपग्रह नाही.

√ पहाटे हा ग्रह पूर्व क्षितिजावर व संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर दिसला.


३) पृथ्वी : 


√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह. 

√ सर्वाधिक घनतेचा ग्रह(५.५) gm/cm' 

√ चंद्र हा एकमेव उपग्रह.

√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह. 

√ पृथ्वीची विभागणी सुमारे ७१% पाणी व २९% भूभाग अशी करण्यात येते. 

√ पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध म्हणून तर दक्षिण गोलार्ध हा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो.


◆ पृथ्वीची माहिती


√ पृथ्वीचा आकार - जिऑईड (पृथ्वी धूवाकडील बाजूला चपटी व विषुववृत्तालगत फुगीर)

√ पृथ्वीची उत्पत्ती - सुमारे ४५० कोटी वर्षापूर्वी

√ पृथ्वीचे क्षेत्रफळ - ५ अब्ज चौ.कि.मी.

√ पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ - ३९,८४३ कि.मी.

√ ध्रुवीय परिघ - ३९,७४६ कि.मी.

√ विषुववृत्तीय व्यास - १२,७५४ कि.मी.

√ ध्रुवीय व्यास - १२,७१० कि.मी.

√ पृथ्वीची घनता - ५.५ gm/em' |

√ सूर्यापासून अंतर - अंदाजे १५ कोटी कि.मी.

√ पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम एऍटोस्थेनिस या इजिप्तच्या संशोधकाने शोधला.

√ पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक वेग (escape velocity) ११.२ किमी/सेकंद.

√ पृथ्वीचा परिवलन काल - २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद. 

√ परिभ्रमण (सूर्यभोवती फिरणे) - ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट ५४ सेकंद


४) मंगळ (Mars) : 


√ लाल ग्रह असेही म्हणतात. 

√ कारण Feo चे प्रमाण जास्त.

√ शुक्राप्रमाणे मंगळ हादेखिल पृथ्वीला जवळचा ग्रह

√ मानव वस्ती शक्य असलेला ग्रह

√ त्यामुळे जगातील प्रमुख देश आज मंगळावर संशोधन करण्यात गुंतलेले आहे. (pathfinder, curosity यान)

√ उपग्रहांची संख्या : दोन (Phobos, Deimos)

√ Nix oympia हे सर्वात उंच शिखर (ऐवरेस्ट पेक्षा ३ पट उंच)


५) गुरू (Jupiter) : 


√ सर्वात मोठा व जड ग्रह. 

√ गुरूच्या पृष्ठभागावर पांढरट पट्टे आढळतात. 

√ गुरू हा पृथ्वीच्या तुलनेत १३०० पटीने मोठा आहे.

√ अलीकडे गुरूच्या भोवती शनीप्रमाणे कडी आढळून आली आहे.

√ उपग्रहांची संख्या - ६३ (Lo, Europe, casillo, Ganymeda)

√ गुरूला स्वत:भोवती एक फेरी घालण्यास (परिवलन) १ तास ५० मिनिटे लागतात. 

√ तर सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास १२ वर्षे लागतात. 

√ सर्व ग्रहांपैकी सर्वात छोटा दिवस गुरू चा आहे.


६) शनि (Saturn) :-


√ दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह. 

√ निळा रंग ही शनिची महत्वाची खूण आहे.

√ सर्वात कमी घनतेचा ग्रह (०.६८) gm/cm'.

√ या ग्रहाभोवती तीन कडी आहेत. कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात.

√शनि - ३१ उपग्रह (Titan, Rhea, Tethys). 

√ Titan हा सूर्यमालेतील एकमेव उपग्रह आहे ज्याला स्वत:चे वातावरण आहे.


७) युरेनस : (प्रजापती)


√ रंग हिरवट निळा आहे.

√ युरेनस स्वत:भवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

√ त्यामुळे युरेनस वर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो.

√ उपग्रह : २७ (Ariel, Miranda, Titanica, oberon)

√ यूरेनस या ग्रहाला प्रजापती हे भारतीय नाव जनार्दन बाळाजी मोडक यांनी दिले.


८) नेपच्यून (वरूण):


√ सूर्याला आणि पृथ्वीला सर्वात लांबचा ग्रह.

√ निळ्या रंगाचा ग्रह. 

√ या ग्रहाच्या भवती मिथेन वायु जास्त असावे.

√ उपग्रह - १४ (Titron, merid)

√ या ग्रहाभोवती पाच कडी आहेत. 

√ हा सर्वात शित ग्रह आहे.


◆ बटूग्रह


√ नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकार 

√ उदा.: प्लुटो, पॅसिडॉन.

√ महत्त्वाचे : ऑगस्ट २००६ मध्ये प्लूटो (कुबेर) हा ग्रह' म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली. 

√ कारण : प्लुटो वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करित व प्लुटो नेपच्यूनची कक्षा ओलांडत असे.

√ अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ क्लॉईड टॉम्बथ याने १९३० मध्ये प्लूटो या ग्रहाचा शोध लावला होता.

No comments:

Post a Comment