66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
(A) अंधाधुन
(B) उरी: द सर्जिकल स्ट्राईक
(C) पद्मावत
(D) बधाई हो
Ans:-A
कोणत्या ब्रिटिश विनोदी अभिनेत्याला लॉस एंजेलिसमधील ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?
(A) जॉर्ज कार्लिन
(B) स्टीव्ह कूगन
(C) रसेल हॉवर्ड
(D) जोसेफ हॉवर्ड
Ans:-B
जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?
(A) समग्र जल सुरक्षा
(B) समग्र जल शिक्षा सुरक्षा
(C) समग्र जल-जीवन सुरक्षा
(D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा
Ans:-D
खालीलपैकी कोणत्या राज्याने 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी ‘स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम’ सादर केली?
(A) पश्चिम बंगाल
(B) तामिळनाडू
(C) ओडिशा
(D) महाराष्ट्र
Ans:-C
भारतातली पाण्याखालून जाणारी पहिली रेलगाडी कुठे धावणार?
(A) हुसेन सागर तलाव, हैदराबाद
(B) हुगळी नदी, कोलकाता
(C) ब्रह्मपुत्र नदी, गुवाहाटी
(D) अपोलो वॉटरफ्रंट बंदर क्षेत्र, मुंबई
Ans:-B
कोणत्या लघू वित्त बँकेला 8 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला?
(A) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
(B) फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
(C) एयू स्मॉल फायनान्स बँक
(D) जन स्मॉल फायनान्स बँक
Ans:-D
कुठे इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) तर्फे तिसरी आंतरराष्ट्रीय विद्युत-क्षम वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली?
(A) गुरुग्राम
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) गुवाहाटी
Ans:-A
CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) चतुर्थ
Ans:-D
CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, कोणता देश युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे?
(A) संयुक्त राज्ये अमेरीका
(B) ब्रिटन
(C) चीन
(D) जापान
Ans:-A
कोण 2018-19 या सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता आहे?
(A) मारिओ मॅन्डझुकिक
(B) लिओनेल मेस्सी
(C) क्रिस्टियानो रोनाल्डो
(D) यापैकी कुणीही नाही
Ans:-B
कोणती व्यक्ती लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019 अंतर्गत स्थापना करण्यात येणार्या लवाद परिषदेचे अध्यक्ष असणार?
(A) भारताचे राष्ट्रपती
(B) पंतप्रधान
(C) अर्थमंत्री
(D) भारताचे प्रधान न्यायाधीश
Ans:-D
कोणत्या फिन-टेक स्टार्टअप कंपनीने 'फ्रीडम कार्ड' सादर केले आहे जे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी भारतातले पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे?
(A) लेन्डिंगकार्ट
(B) मशरेक ग्लोबल
(C) एनकॅश
(D) क्याश
Ans:-C
कोणत्या खासगी बँकेने हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले?
(A) बंधन बँक
(B) इंडसइंड बँक
(C) फेडरल बँक
(D) RBL बँक
Ans:-D
‘रॉजर्स चषक 2019’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?
(A) रॉजर फेडरर
(B) राफेल नदाल
(C) डॅनिल मेदवेदेव
(D) यापैकी नाही
Ans:-B
रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक ___ स्पर्धा आहे.
(A) बॅडमिंटन
(B) टेबल टेनिस
(C) टेनिस
(D) स्क्वॅश
Ans:-C
कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत?
(A) घोटू राम मीना
(B) अरुण कुमार सिंग
(C) गायत्री कुमार
(D) संजय कुमार वर्मा
Ans:-A
प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक ___ यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते.
(A) प्रकाश महापात्रा
(B) प्रत्यूश दाश
(C) दयानिधी नायक
(D) अमित कुमार
Ans:-C
भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा.
(A) वाइस प्रेसिडेंट नायडू
(B) लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग
(C) व्हॉट शुड डू अॅज लीडर
(D) लिडिंग इंडिया
Ans:-B
ऑगस्ट 2019 महिन्यात कोणत्या भारतीय क्रिडा मंडळाने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येण्यास मान्य केले?
(A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
(B) भारतीय नौदल क्रिडा नियामक मंडळ
(C) भारतीय सैन्य क्रिडा नियामक मंडळ
(D) भारतीय स्क्वॉश नियामक मंडळ
Ans:-A
संरक्षण मंत्र्यांनी सेवेत असलेल्या कुटुंबातल्या एकट्या पुरुष पालक कर्मचार्यांना बाल देखरेख रजा (CCL) सुविधेचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
I. 40 टक्के अपंगत्व असलेल्या बालकांच्या बाबतीत CCL रजा घेण्यासाठी बालकासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
II. CCL रजेचा कमीतकमी कालावधी जो एका वेळी मिळू शकेल तो 5 दिवस एवढा कमी करण्यात आला आहे.
(A) केवळ I
(B) केवळ II
(C) I आणि II दोन्ही
(D) ना I, ना II
Ans:-C
ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली?
(A) सँड्रा टॉरेस
(B) जिमी मोरालेस
(C) अलेजान्ड्रो मालडोनाडो
(D) अलेजान्ड्रो गियामॅटी
Ans:-D
इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी (INSA) याच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
(A) चंद्रिमा शहा
(B) देविका लाल
(C) सुब्रत बॅनर्जी
(D) कविता देसाई
Ans:-A
भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमधील सांस्कृतिक आणि लोकसंबंध अधिक दृढ करण्यासाठी __ करारांवर स्वाक्षर्या झाल्या.
(A) पाच
(B) दोन
(C) चार
(D) तीन
Ans:-C
ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या ज्येष्ठ वकिल आणि अतिरिक्त महाधिवक्ता राहिलेल्या व्यक्तीचे नाव काय होते?
(A) संजय जैन
(B) अमरेंद्र शरण
(C) देवेंद्र यादव
(D) विपुल नगर
Ans:-B
रिलायन्स जियो कंपनीने भारतभर क्लाऊड डेटा सेंटरांची स्थापना करण्यासह डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी ___ सोबत दीर्घकालीन भागीदारी केली आहे.
(A) मायक्रोसॉफ्ट
(B) गुगल
(C) इन्फोसिस
(D) विप्रो
Ans:-A
मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?
(A) ऐश्वर्या पिसे
(B) अरमान इब्राहिम
(C) आदित्य पटेल
(D) समीरा सिंग
Ans:-A
कोणते शहर फिजी या देशाची राजधानी आहे?
(A) हेलसिंकी
(B) हवाना
(C) सुवा
(D) ओस्लो
Ans:-C
कोणती व्यक्ती आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाची सदस्य बनली?
(A) दुती चंद
(B) पी. टी. उषा
(C) पी. व्ही. सिंधू
(D) मेरी कोम
Ans:-B
12 ऑक्टोबरपासून तीन दिवस चालणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2019’ ही परिषद कुठे भरणार आहे?
(A) श्रीनगर
(B) जयपूर
(C) कोचीन
(D) मुंबई
Ans:-A
कॅब-सेवा देणारी ओला या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राशी संबंधित कोणत्या स्टार्टअप कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली?
(A) Ridder.ai
(B) Stack.ai
(C) Yolo.ai
(D) Pikup.ai
Ans:-D
कोण फ्रान्सच्या सरकारकडून 'शेवेलीएर डी आय’ऑरड्रे ड्यू मेरीट एग्रीकोलेटो' हा सन्मान प्राप्त करणारा पहिला भारतीय आचारी ठरला?
(A) अर्जुन देसाई
(B) सुभाष गर्ग
(C) प्रियम चटर्जी
(D) दिपक मिश्रा
Ans:-C
फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
(A) न्या. मदन लोकूर
(B) न्या. कमल कुमार
(C) न्या. ए. के. मिश्रा
(D) न्या. टी. एस. ठाकूर
Ans:-A
‘टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) बांग्लादेश
(D) इंग्लंड
Ans:-A
No comments:
Post a Comment