Wednesday, 9 December 2020

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम


🌷‘‘विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून, जगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत. विविधतांना जोडणारा घटक फक्त भारताजवळच असून, आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात केले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.


🌷भागवत म्हणाले की, ‘‘एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया असे दोन ध्रुव जगात निर्माण झाल्याचे आम्ही पाहिले आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर देशांना शस्त्रपुरवठा करून  युद्ध करणे सुरू केले. सोबतच त्यांनी आर्थिक क्षेत्रावरही नियंत्रणास सुरुवात केली. त्यामुळे ‘शीतयुद्ध’ नावाची नवी युद्धशैली आम्ही पाहिली. त्यात अमेरिका जिंकली आणि रशियाचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिका ही एक महाशक्ती बनली. आता अमेरिकेच्या वर्चस्वाखालीच सर्व सूत्रे हलणार, असे सांगण्यात येऊ लागले. पण तसे झाले नाही.’’


🌷‘‘जगाला सुखी करण्याची गोष्ट तर दूरच, पण अमेरिका या जगाला एकत्रही ठेवू शकली नाहीत. कालौघात अनेक भाषा संपल्या, अनेक संस्कृतींचा अंत झाला, विविधतेची आणि पर्यावरणाची हानी झाली. संपूर्ण जगाच्या कल्याणाची इच्छा ‘मॅक्झिमम गुड्स, मॅक्झिमम पीपल’ पर्यंत मर्यादित आणि तीही काही मोजक्या देशांपुरती सिमीत राहिली’’,याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. जगाच्या दक्षिण गोलार्धातील सारे देश नैसर्गिक साधन-संपत्तीने समृद्ध होते. विकसित देशांनी मोजक्या लोकसंख्येसाठी सारी साधने वापरली, असे भागवत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...