०१. औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीबरोबर इंग्लंड मध्ये कापड धंद्याचा चांगला झाला. भारतातही या सुताला मागणी वाढू लागली. १८२७ साली सुताचा खप ३० लाख पौंड होता. तो १८३७ मध्ये दुपटीपेक्षा अधिक झाला. त्यामुळे मलमलीसाठी प्रसिद्ध असलेले ढाका शहर पार उध्वस्त झाले.
०२. १७०० व १७२० मध्ये ब्रिटीश संसदेने कायदे करून भारतीय सुती व रेशमी कापड इंग्लंड वासियांना वापरण्यास बंदी केली.
०३. मुगल बादशाहने कंपनीच्या व्यापारावर जकातमाफी दिलेली होती. कंपनीचे व्यापारी याचा गैरफायदा घेत असत. याच कारणावरून जेव्हा नवाब मीर कासीमने सर्वांनाच जकातमाफी करून टाकली तेव्हा इंग्रजांनी नवाबाशी युद्ध केले.
०४. इंग्रजाच्या धोरणामुळे विणकर व अन्य वस्तूंचे उत्पादक देशोधडीला लागण्याची वेळ आली. बंगालमध्ये सत्ता हाती येताच रेशमी कापड उत्पादकांना पद्धतशीरपणे नाहीसे करण्याची योजना आखली गेली.
०५. नील उद्योगावर कंपनीच्या धोरणामुळे झालेल्या घातक परिणामांचे वर्णन निलदर्पण नाटकात पहावयास मिळते. त्या नाटकाचे इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या जेम्स लॉंग यांना दंड व कैदेची शिक्षा करण्यात आली.
०६. जहाज बांधणीचा व्यवसाय भारतात फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. जमशेदजी जीजीभाई सारखे उद्योजक १८४९ पर्यंत दीर्घ पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या बोटी बांधत असत.
०७. इंग्रजांनी भारताचे फार मोठे आर्थिक शोषण केले. अनेक भारतीयांना भारतीय संपत्तीचे होणारे शोषण स्पष्ट जाणवले होते. एक हिंदू या टोपण नावाने लिहिणाऱ्या भास्कर पांडुरंग तर्खडकर यांनी बॉम्बे टाइम्स मधील आपल्या पत्रात याबद्दल सरकारचे वाभाडे काढले.
No comments:
Post a Comment