Saturday 18 March 2023

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...