Sunday, 13 December 2020

आझाद हिंद सरकार


◆ नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरच्या भूमीवरून आझाद हिंद राष्ट्राची घोषणा केली व स्वत:चे सरकारही स्थापन केले, त्या ओजस्वी व ऐतिहासिक घटनेला आज ७५ वर्षे झाली.


◆ ब्रिटिश सत्तेने भारताला 'स्वातंत्र्य' देण्याच्या आधीच नेताजींनी स्वतंत्र राष्ट्राची द्वाही फिरवली. हे राष्ट्र औट घटकेचे-इन मिन दोन वर्षांचेच होते, हे खरे पण त्यामुळे ब्रिटिश सत्तेसमोर आव्हान उभे ठाकले, हेही वास्तव आहे.


◆ जर्मनी, जपान यांचे दोस्त राष्ट्रांविरुद्ध महायुद्ध चालू असतानाच जपानच्या मदतीने नेताजींनी 'अर्जी-ए-हुकुमत आझाद हिंद' या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून साऱ्या जगाला धक्का दिला. १८५७च्या लढ्यानंतर ब्रिटिश साम्राज्याला असे आव्हान कुणी दिले नव्हते.


◆  नव्या देशाकडे स्वत:ची भूमी नव्हती. म्हणून जपानने त्यांच्या ताब्यात आलेली अंदमान, निकोबार बेटे दिली. पोर्ट ब्लेअर ही राजधानी घोषित करण्यात आली. तिथे तिरंगा फडकला व नेताजींनी 'राष्ट्रप्रमुख' म्हणून मानवंदनाही स्वीकारली.


◆  जपान, जर्मनीचे साथी असलेल्या फिलिपाइन्स, क्रोशिया, इटली, थायलंड आदी सात देशांनी नेताजींच्या सरकारला मान्यता दिली. १९४३च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पूर्व आशिया परिषदेला 'राष्ट्प्रमुख' म्हणून नेताजी उपस्थित राहिले.


◆  अंदमान-निकोबार द्विप समुहाचे नाव बदलून ते शहीद व स्वराज असे करण्यात आले.


◆  हे सारे होत असले तरी ते सारेच क्षणभंगूर ठरले कारण युद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय होत गेला व जपानचा आधार तुटल्याने आझाद हिंद एकाकी पडले. त्यातच १८ आॅगस्ट १९४५ ला नेताजी गूढरित्या गायब झाले.


◆  त्यांच्या जाण्याबरोबरच आझाद हिंदचे स्वप्नही उध्वस्त झाले. नेताजींचा हा क्रांतिकारक प्रयत्न तिथेच थिजला.


◆  १५ आॅगस्ट १९४७ ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण 'अर्जी-ए-हुकुमत आझाद हिंद'च्या खुणा मात्र पुसून टाकण्यात आल्या.


◆  शहीद व स्वराज ही नेताजींनी बदललेली अंदमान, निकोबारची नावेही आपण राखली नाहीत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...