महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्टे पुढील प्रमाणे आहेत ..
१) हे नवीन गुन्हे समाविष्ट
- समाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे व बदनामी करणे.
- बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे.
- समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.
- एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.
- बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत लागू करणे.
२) शिक्षेत वाढ
- बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.
- शिक्षांचा कालावधी वाढविला आहे.
- ॲसीड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टीक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.
No comments:
Post a Comment