Wednesday, 23 December 2020

भारतात महामार्गांचा हरित विकास.


🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता

भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सुरक्षित आणि हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर एवढा अंदाजित खर्च असलेल्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे.


🔶भारत सरकारच्या वतीने डॉ. महापात्रा आणि जागतिक बँकेच्या वतीने कार्यवाहक संचालक सुशिला गुल्याणी यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.


🛑 ठळक बाबी....


🔶या प्रकल्पामुळे सुरक्षा आणि हरित तंत्रज्ञानातली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची क्षमता वृद्धिंगत होणार.

हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका प्रकल्प स्थानिक आणि किरकोळ साहित्य, औद्योगिक उप-उत्पादने आणि इतर जैवविज्ञान उपायांसाठी सुरक्षित आणि हरित तंत्रज्ञानाचा आरखडा एकत्रित करून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय विविध भौगोलिक क्षेत्रातल्या एकूण 783 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी मदत करणार आहे.हा प्रकल्प महामार्गांच्या बांधकाम आणि देखरेख क्षेत्रात हरितगृह वायु (GHG) उत्सर्जन कमी करण्यात मदत करणार.


🔴 जागतिक बँक (WB) विषयी....


🔶जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झालेल्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.संयुक्त राज्ये अमेरिका या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...