🔹 बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
🔹 महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
🔹 महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
🔹 वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
🔹 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
🔹 सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
🔹 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
🔹 कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
🔹 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
🔹 भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
🔹 सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
🔹 फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
🔹 महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
🔹 माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
No comments:
Post a Comment