Thursday, 24 December 2020

लेवांडोस्की सर्वोत्तम

🔥अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

🔥झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. परंतु ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टिनो यांनी म्युनिक येथे जाऊन लेवांडोस्कीला पुरस्कार प्रदान केल्याची चित्रफीत या सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली. नेहमीप्रमाणे जगभरातील निवडक राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, क्रीडा पत्रकार आणि चाहत्यांच्या मतांचा आढावा घेऊन विजेत्यांची निवड करण्यात आली.

🔥३२ वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक ५५ गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...