Saturday, 5 December 2020

समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज



● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.


● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील. 


● 'विक्रांत', 'विराट' या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता 'विक्रमादित्य' ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. 


● कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली 'विक्रांत' ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत आहे. 


अशी आहे युद्धनौका

- वजन : ४० हजार टन

- लांबी : २६२ मीटर किंवा ८६० फूट

- स्की जंप (विमानोड्डाणासाठीची विशेष चढण)सह तीस विमाने हेलिकॉप्टरचा समावेश शक्य 

- मिग २९ विमाने व कामोव्ह किंवा सी-किंग हेलिकॉप्टर राहू शकतात

- कामोव्ह हेलिकॉप्टर शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देईल

- सी-किंग हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून नष्ट करेल


महत्वाचे मुद्दे


● या विमानवाहू युद्धनौकेचे नाव ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या *पहिल्या विमानवाहू युद्धनौका  आयएनएस विक्रांत* च्या नावावरून ठेवण्यात आले आहे. *1997* मध्ये आयएनएस विक्रांतला नौदलाने आपल्या ताफ्यातून निवृत्त केले होते.


● सध्या, रशियाकडून घेण्यात आलेली  44,500 टन क्षमता असलेली *आयएनएस विक्रमादित्य* ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे आहे.


● आयएनएस विक्रमादित्यप्रमाणेच विक्रांतदेखील विमान प्रक्षेपित करण्यासाठी व उतरण्यासाठी करण्यासाठी *STOBAR* (Short Take-Off But Arrested Recovery) यंत्रणा वापरणार आहे.


● या युद्धनौकेची रचना आणि बांधणी पूर्णपणे भारतीय असून, या नौकेच्या बांधणीमुळे भारत अशी नौका तयार करण्याची शक्ती असणाऱ्या *अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स* या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.

No comments:

Post a Comment