🌀 चीनची चँग 5 चांद्रमोहीम आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.
🌀 चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर मंगळवारी यशस्वीरीत्या उतरले असून तेथे चीनचा ध्वज यंत्रमानावाच्या बाहूंनी लावण्यात आला.
🌀 तर हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे. त्याचे लँडर, ऑर्बिटर,अॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.
चीनच्या अवकाश संस्थेने म्हटले आहे,की कुठल्याही ग्रह किंवा उपग्रहावरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यान उडवणारा चीन हा पहिला देश ठरला आहे.
🌀 चीनने पाठवलेल्या यानातील यांत्रिक बाहूने तेथे चीनचा ध्वज लावण्यात आला असून खडकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.
🌀 तसेच त्यातून चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत.
🌀 चद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.
No comments:
Post a Comment