Saturday, 5 December 2020

जागतिक आरोग्य संघटनेचा ‘जागतिक मलेरिया अहवाल 2020’

🔶 गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘जागतिक मलेरिया अहवाल (WMR) 2020’ जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रसिद्ध केला आहे.


⭕️ ठळक बाबी


🔶 मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 2018 सालाच्या तुलनेत 2019 साली प्रकरणांमध्ये 17.6 टक्के घट झाली.


🔶भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. वार्षिक परजीवी घटनांमध्ये (API) 2017 सालाच्या तुलनेत 2018 साली 27.6 टक्के घट आणि 2019 साली 18.4 टक्के घट झाली.


🔶प्रादेशिक स्तरावरील संख्येनुसारही भारतामध्ये या आजाराची रुग्णसंख्या 20 दशलक्ष ते 6 दशलक्ष अशी लक्षणीय रित्या कमी झाली आहे. मलेरिया रुग्ण संख्येचा टक्का वर्ष 2000 ते वर्ष 2019 पर्यंतच्या काळात 71.8 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर आजाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही 73.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.


🔶मलेरियात दगावण्याच्या प्रमाणात 92 टक्के घट झाली आहे. परिणामी ‘मिलेनियम विकास ध्येये’ मधले सहावे ध्येय (वर्ष 2000 ते वर्ष 2019 या काळात रुग्णसंख्येत 50-75 टक्के घट) साध्य करण्यात यश आले आहे.


🔶मलेरियाच्या उच्चाटनाचे प्रयत्न देशात 2015 सालापासून सुरू झाले आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2016 साली मलेरिया उच्चाटनासाठी  राष्ट्रीय नियमावली (NFME) प्रत्यक्षात आणल्यानंतर त्यांना वेग आला.  


🔶मंत्रालयाने जुलै 2017 मध्ये मलेरिया उच्चाटनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (2017-22) प्रसिद्ध केली, ज्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या धोरणाची मांडणी केली आहे.


🔶ओडीशा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये 45.47 टक्के मलेरिया आजाराचे रुग्ण आहेत (भारताच्या 3,38,494 या एकूण रुग्णसंख्येपैकी 1,53,909 रुग्णसंख्या), तर 2019 साली फाल्सिफेरम मलेरियाचे 70.54 टक्के रुग्ण (भारताच्या 1,56,940 या एकूण रुग्णसंख्येपैकी 1,10,708 रुग्णसंख्या) आहेत.


🔶WHO ने भारतासह 11 देशांमध्ये उच्च धोका उच्च परिणाम म्हणजेच HBHI (High Burden High Impact) प्रदेश निर्धारित केले होते. HBHI कार्यक्रमाची सुरूवात पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ़ आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जुलै 2019 पासून झाली. परिणामी गेल्या दोन वर्षात रुग्णसंख्येत 18 टक्के तर मृत्यूसंख्येत 20 टक्के घट दिसून आली.


🔶मलेरियाचे प्रमाण 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात लक्षणीय आहे (आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश मणीपूर, मिझोरम, नागालँड, ओडीशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, चंदीगड, दमण व दीव, दादरा नगरहवेली आणि लक्षद्वीप). या राज्यांमध्ये मलेरियाचे प्रमाण कमी होताना आढळते आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...