Tuesday, 22 December 2020

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन: 20 डिसेंबर


🍀दरवर्षी 20 डिसेंबर या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन (International Human Solidarity Day) साजरा करतात.  


🍀आतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा करण्यामागचा उद्देश्य असा आहे की, लोकांच्या विविधतेमधील एकात्मतेचे महत्त्व स्पष्ट करीत जनजागृती करणे. ‘हेल्प4ह्यूमेन रिसर्च अँड डेवलपमेंट’ या संस्थेनी भारतीयांना एकात्मतेच्या सूत्रात बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.


🔴पार्श्वभूमी


🍀दिनांक 22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी मानवी एकात्मतेच्या संदर्भात निर्णय घेत दरवर्षी 20 डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन’ पाळण्याचा निर्णय घेतला.  


🍀2030 शाश्वत विकास ध्येय (SDG) पुर्णपणे नागरिक आणि ग्रह या घटकांवर केंद्रित आहेत, ज्यात मानवाधिकारांना पाठबळ दिले जात आहे आणि दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई या समस्यांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या निर्धारासाठी वैश्विक भागीदारीने ते समर्थित आहे. त्यादृष्टीने जागतिक सहकार्य आणि एकात्मतेची पायाभरणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन’ साजरा करतात.


🍀फब्रुवारी 2002 मध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी UNDP चा ‘जागतिक एकता कोष’ स्थापन करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...