🌻‘रयुगू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागाखालच्या खडकाचे नमुने घेवून जपानचे ‘हायाबुसा-2’ यान 6 डिसेंबर 2020 रोजी पृथ्वीवर परतले.
🌻शास्त्रज्ञांना आशा आहे की नमुन्याचे वजन 0.1 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. नमुने असलेला एक कॅप्सूल दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात सापडला.
🛑‘हायाबुसा-2’ मोहीम
🌻‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संशोधन संस्थेकडून संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले होते. यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या (asteroid) निरीक्षणासाठी पाठवले गेले होते.
🌻अतराळयानावर असलेले रोव्हर ‘रयुगू (Ryugu)’ या नावाच्या लघुग्रहावर उतरविण्यात आले. एखाद्या लघुग्रहावर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी आणि खडकाचे नमुने गोळा करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले होते. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यात आले.
🌻हायाबुसा यानात ‘मिनरव्र्हा 2’ रोव्हर रोबोट व मस्कॉट हा फ्रेंच रोबोट यांचा समावेश होता. यान फ्रीजच्या आकाराएवढे होते. हायाबुसाचा अर्थ जपानी भाषेत ससाणा असा आहे.
🛑लघुग्रह म्हणजे काय आहे?
🌻सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे लघुग्रह वा अशनी आणि उल्का होय. ‘रयुगू’ हा अगदी प्राथमिक लघुग्रह आहे. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.
🛑‘रयुगू’ लघुग्रह
🌻‘रयुगू’ लघुग्रह पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. ‘रयुगू’ या लघुग्रहाची निर्मिती साधारणपणे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे सौरमालेच्या जन्मावेळची असून त्यात मोठ्या प्रमाणवर कार्बनी पदार्थ व पाणी आहे असे समजले जाते, त्यामुळे त्याच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.
No comments:
Post a Comment