Wednesday, 9 December 2020

दिनांक 2 डिसेंबर 1984 या दिवशीची दुर्घटना

 


◾️भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित झाले. या दुर्घटनेच्या स्मृतीत देशात 2 डिसेंबरला ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन’ पाळला जातो.


◾️औद्योगिक क्षेत्राला या घटनेची आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी जागृती पसरवण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.


◾️औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर होणार्‍या प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक स्त्रोत आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी प्रत्येक स्तरावर विविध उपक्रमे राबवली जातात.


🔺पार्श्वभूमी


◾️संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी (ILO) त्याच्या “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.


◾️मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता. त्यात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे हजारो पिडीत व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...