भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध पदांसाठीच्या मेगा भरतीकरता (Mega Recruitment) 15 डिसेंबरपासून ऑनलाइन परीक्षा (online Exam) सुरू होणार आहेत.
तीन टप्प्यात या ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. तब्बल एक लाख चाळीस हजार पदांसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे (Railway Recruitment Board-RRB) या परीक्षा घेण्यात येणार असून, याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.
'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरातील तब्बल 2.5 कोटी उमेदवार ऑनलाइन या परीक्षा देण्याची अपेक्षा आहे. या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी रेल्वेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. अनेक तारखांना आणि शिफ्टसमध्ये या परीक्षा होतील. पहिल्या टप्प्यातील परीक्षा 15 ते 18 डिसेंबर दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यातील एनटीपीसी विभागातील परीक्षा 28 डिसेंबरपासून सुरू होतील, त्या मार्चपर्यंत चालतील. तर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल पासून सुरू होऊन जूनअखेरपर्यंत चालतील, असं रेल्वेनं कळवलं आहे.
No comments:
Post a Comment