Tuesday, 22 December 2020

देशात 12,852 बिबटे आहेत: ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल..


🐆कद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थिती सांगणारा ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल प्रकाशित करण्यात आला.


🌵ठळक माहिती.....


🐆वर्ष 2018 मध्ये, भारतात आता 12,852 बिबटे असून 2014च्या सर्वेक्षणात  ही संख्या 7910 होती. अर्थात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.


🐆मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3421, 1783 आणि 1690 बिबटे असल्याचा अंदाज आहे.पूर्व घाटात सर्वाधिक म्हणजेच 8.71 बिबटे तर पश्चिम घाटात 3387 बिबटे आढळून आली आहेत.


🐆बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत.

संरक्षित आणि बहुउपयोगी जंगल परिसरात वाघ आणि बिबटे आढळतात. बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे पर्यावरण जतनासाठीच्या प्रयत्नांचे आणि वन्य जीवन आणि जैव विविधता बहरत असल्याचे द्योतक आहे.

No comments:

Post a Comment