Tuesday, 29 December 2020

सांगोला ते शालीमार दरम्यान धावली 100 वी किसान रेलगाडी


🔶28 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातले सांगोला (जिल्हा सोलापूर) ते पश्चिम बंगालमधले शालीमार या दोन स्थानकांच्या दरम्यान 100 व्या किसान रेलगाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने झेंडा दाखवून मार्गस्थ केले.


🔶पाठविण्यात येणाऱ्या अनेक प्रकाराच्या मालाच्या एकत्रित रेलगाडी वाहतूक सेवेमध्ये फुलगोबी, ढोबळी मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा अशा भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सीताफळ इत्यादी फळे असणार आहेत. मार्गातल्या सर्व थांब्यांवर मालवाहतुकीच्या या रेलगाडीच्या आकाराला कोणतेही बंधन न ठेवता नाशिवंत माल रेलगाडीमध्ये भरणे आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली आहे.


🛑 ठळक बाबी


🔶कद्र सरकारने फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के सवलत दिली आहे.पीएम कृषी संपदा योजनेच्या अंतर्गत मेगा फूड पार्क, शीत साखळी पायाभूत आणि कृषी प्रक्रिया क्लस्टर अंतर्गत अशा 6500 प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज अंतर्गत सूक्ष्म अन्न-प्रक्रिया उद्योगासाठी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


🛑‘किसान रेलगाडी’ विषयी


🔶किसान रेलगाडी म्हणजे देशातल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. गेल्या 4 महिन्यात 100 किसान रेलगाडी धावल्या.


🔶पहिली किसान रेलगाडी 7 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर पर्यंत चालवण्यात आली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत हा प्रवास वाढविण्यात आला. शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही रेलगाडी सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु करण्यात आली.


🔶देशभरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी किसान रेलगाडीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. ही सेवा नाशिवंत उत्पादनांची अखंड पुरवठा साखळी प्रदान करते.


🔶किसान रेलगाडीतून वाहतूक करण्यासाठी किमान प्रमाण निश्चित करण्यात आलेले नाही त्यामुळे छोटे उत्पादनही कमी किमतीत मोठ्या बाजारात पोहोचू शकतात. शेतकरी आपला कृषी माल आता दुसऱ्या राज्यातही विकू शकतो.


🔶किसान रेलगाडी म्हणजे फळे, भाजीपाला, दुध, मासे यासारखा नाशिवंत माल पूर्ण सुरक्षितपणे वाहून नेणारे फिरते शीतगृह आहे. रेल्वे स्थानक परिसरात नाशवंत रेलगाडी कार्गो केंद्र उभारण्यात येत आहेत, ज्यामध्ये शेतकरी आपल्या कृषी मालाची साठवण करू शकतात.

No comments:

Post a Comment