Wednesday 9 December 2020

फायझर लशीमुळे 10 दिवसांत संरक्षण.



कोविड-19 विषाणूवरील फायझर व बायोएनटेक  यांची लस पहिल्याच मात्रेत दहा दिवसांत विषाणूपासून रुग्णाला उत्तम संरक्षण देते, असे दिसून आले आहे.

तर अमेरिकी अन्न व औषध प्रशासनापुढे या लशीच्या चाचण्यांबाबतची जी कागदपत्रे मांडण्यात आली  त्यातून हे स्पष्ट झाले आहे.


अमेरिकेतील लस सल्लागार गटाची जी बैठक झाली, त्यात लशीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. या बैठकीत ज्या माहिती अहवालांचे सादरीकरण झाले त्यात 53 पानांच्या मूळ माहिती विश्लेषण पुस्तिकेचा समावेश आले.तसेच गेल्या महिन्यात ही लस दोन मात्रा दिल्यानंतर 95 टक्के प्रभावी ठरली होती. ती 21 दिवसांच्या  अंतराने देण्यात आली.

 

गेल्या महिन्यात बायोएनटेक व फायझर यांनी लशीच्या दोन मात्रानंतर 95 टक्के प्रभावाचा दावा केला असून प्रत्यक्षात फायझरची लस फार लवकर करोनाविरोधात काम करू लागते.


वय, वंश, वजन यापैकी कुठल्याही घटकाचा विचार केला, तरी ही लस जास्त चांगली व वेगाने विषाणूचा प्रतिबंध करणारी असल्याचे दिसून आले आहे. या लशीचे कुठलेही गंभीर गैरपरिणाम दिसून आलेले नाहीत.

No comments:

Post a Comment