Thursday, 10 December 2020

1) मलयगिरि



दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.


अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम्‌ टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्‍या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.


पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.


या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.


2) भारतातील एक प्राचीन ठिकाण. 

याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.


रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...