Friday, 27 November 2020

प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)



वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.


🔶मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

🌱कर्तरी प्रयोग

🌱कर्मणी प्रयोग

🌱भावे प्रयोग


1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :


जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा .

👉तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)

👉ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)

👉त चित्र काढतात. (कर्ता- वचन)


कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

1. सकर्मक कर्तरी प्रयोग

2. अकर्मक कर्तरी प्रयोग


1. सकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.


उदा .

राम आंबा खातो.

सीता आंबा खाते. 

ते आंबा खातात. (वचन)


2. अकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.


उदा .

राम पडला

सिता पडली (लिंग)

ते पडले (वचन)


2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.


उदा .

राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)

राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)

राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)

No comments:

Post a Comment