Wednesday, 4 November 2020

US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम




🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेच्या वापरात विक्रमी वाढ


🔸अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? किंवा जो बायडेन यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची धुरा जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. दरम्यान, अमेरिकेत EARLY BALLOTS CAST सिस्टमदेखील कार्यान्वित आहे.

जाणून घेऊया काय आहे ही प्रक्रिया.


🔸अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेपूर्वीच जवळपास साडेसात कोटी लोकांनी आपलं मत दिलं आहे. करोना विषाणूच्या संकटादरम्यान यावेळी मेल-इन मतदानाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. दरम्यान, याद्वारे निरनिराळ्या राज्यांतील अनेकांनी आपलं मत दिलं आहे. मुख्य मतदानाच्या मतमोजणीसोबतच ही मतं मोजली जाणार आहेत. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत EBCS बद्दल सांगण्यात आलं आहे. जी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


🔸काय आहे Early ballots cast system?


एकाच दिवसात कोट्यवधी लोकांनी मत देणं ही अशक्य बाब आहे. यासाठी अमेरिकेतील संविधानात एक पर्याय सूचवण्यात आला आहे. ज्याद्वारे मतदारांना मतपत्रिकेद्वारे किवा मेलद्वारे मत देता येतं. याचा वापर अमेरिकेतील ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या किंवा मतदान केंद्रांपासून दूर असलेल्या मतदारांना करता येतो. याव्यतिरिक्त वयस्क लोकांनादेखील हा पर्याय वापरता येतो. मतदानाच्या तीस दिवसांपूर्वी मतदारांना याद्वारे आपलं मत देता येतं. प्रत्येक राज्यांमध्ये स्थानिक निवडणूक आयोग याची तारीख निश्चित करत असतो. तसंच यासाठी नोंदणी करावी लागते, तेव्हाच आपलं मत मेल करता येतं. दरम्यान, या मतांची मोजणीदेखील मुख्य मतमोजणीसोबतच केली जाते. यावेळी या पर्यायानं सर्व विक्रम मोडीत काढल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्येच २.७ कोटी लोकांनी तर आतापर्यंत जवळपास सात कोटींपेक्षा अधिक लोकांची या पर्यायाद्वारे मतदान केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.



🔸भारतीय वंशाच्या मतदारांची ताकद


अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार यावेळीही याप्रकारचे ‘सायलेंट वोटर’च ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment