Saturday, 28 November 2020

“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....



🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो.


🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती (President) हे लोकांद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. 


🔸राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते. 


🔸गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग (priviledged class) नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात.


🔸 “भारत आणि अमेरिका” हे दोन Republic देशांची प्रमुख उदाहरणे आहेत.


🔸२६ जानेवारी १९५० ला भारत हा प्रजासत्ताक झाला.


🔸 महत्वाचे म्हणजे, भारताचे राष्ट्रपती आपल्या दस्तऐवजावर “PRESIDENT REPUBLIC OF INDIA” असेच लिहतात.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...