Monday, 24 June 2024

राज्यसेवा, PSI-STI-ASO प्रश्नसंच

१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

   1) एच. एच. विल्सन  

   2) आर. सी. दत्त  

   3) कार्टराईट    

   4) हारग्रीव्हज


उत्तर :- 2


२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

   1) 21 डिसेंबर 2002  

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 21 जानेवारी 2003 

   4) 31 जानेवारी 2003


उत्तर :- 1


३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

   1) 50 मिलीयन (5 कोटी)   

   2) 58 मिलीयन  (5.8 कोटी)

   3) 60 मिलीयन (6 कोटी)     

   4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- २


४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

   1) 33.3%   

   2) 36.7%    

   3) 24.8%   

   4) 30.0%

 

उत्तर :- 2


५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

   1) भटिंका    

    2) सिंद्री    

    3) कोची  

    4) हाजिरा


उत्तर :- 2



१) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान 

   

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान


   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान


   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान


            अ  ब  क  ड


         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता


   1) ब, ड आणि क    2) अ आणि ब    3) अ, ब आणि क    4) ब आणि ड


उत्तर :- 4


३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क      2) ब आणि क    3) फक्त अ    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)    

  2) गांधी योजना    

 3) नेहरू योजना    

 4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

   1) कर्नाटक   

   2) महाराष्ट्र    

   3) गुजरात 

    4) राजस्थान


उत्तर :- 4



६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

   1) भारताचे राष्ट्रपती    2) पंतप्रधान    3) भारताचे उपराष्ट्रपती    4) वित्तमंत्री

उत्तर :- 2


७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

   1) स्थानिक आणि राज्य सरकार     

   2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड

   3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार      

   4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ

उत्तर :- 3


८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

   ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

   क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?


   1) फक्त अ    

   2) फक्त अ आणि ब  

   3) फक्त ब आणि क    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

   अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.   

    ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

   क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

   वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.


   1) फक्त अ   

  2) फक्त अ आणि ब 

  3) फक्त अ आणि क    

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


1०) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?

   1) आसाम  

   2) मणिपूर     

   3) त्रिपूरा     

   4) बिहार


उत्तर :- 4


१) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ................. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3    2) 40.4      

   3) 45.0    4) 58.4


उत्तर :- 1


२) 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता ?

   1) 13.26%    2) 18.51%    

   3) 20.47%    4) 22.18%


उत्तर :- 2


३) भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची   पसंती मिळत आहे.

   1) आंध्रप्रदेश    2) कर्नाटक    

   3) गुजरात    4) तामिळनाडू


उत्तर :- 3


४) कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?

   1) औद्योगिक धोरण, 1956  

   2) औद्योगिक धोरण, 1970

   3) औद्योगिक धोरण, 1977 

   4) औद्योगिक धोरण, 1991


उत्तर :- 4


५) खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.

   1) खाजगी मालकीचे   

    2) सार्वजनिक मालकीचे

   3) संयुक्त मालकीचे  

   4) यापैकी एकही नाही


उत्तर :- 2



६) आर्थिक विकासावरून पुढील सुचित होते.

   अ) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

   ब) देशाच्या सामाजिक – आर्थिक संचरनेतील प्रागतिक बदल

   क) बेकारी, दारिद्रय आणि विषमतेतील घट


   1) अ फक्त    

   2) अ आणि क    

   3) अ आणि ड   

   4) ब आणि ड


उत्तर :- 4


७) 2011 च्या जनगणनेनुसार ..................... या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर वयोगट 0-6 सर्वात कमी आहे.

   1) हरियाणा आणि जम्मू काश्मिर   

   2) हरियाणा आणि पंजाब

   3) पंजाब आणि राजस्थान  

   4) हरियाणा आणि राजस्थान


उत्तर :- 1


२२०८) केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही  ?

   1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट    

    2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

   3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा    

   4) वरीलपैकी काहीही नाही



उत्तर :- 4


९) भारताच्या पंतप्रधानांनी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी’ नुतनीकरण कार्यक्रम ..................... रोजी सुरू केला.

   1) 13 डिसेंबर 2001    

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 01 डिसेंबर 2004    

   4) 03 डिसेंबर 2005


उत्तर :- 4


१०) खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो  ?

   1) 1951 – 56     

   2) 1961 – 66

   3) 1966 – 69      

   4) 1969 – 72


     उत्तर :- 3


१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

   1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

   2) डॉ. झाकीर हुसेन

   3) श्री. व्ही. व्ही. गिरी     

   4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद


उत्तर :- 2


२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

   1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

   2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

   3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

   4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1


३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

   1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

   2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

   3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

   4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.


उत्तर :- 3


४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

   ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.


   1) अ    

  2) ब   

  3) दोन्हीही 

  4) एकही नाही


उत्तर :- 4


५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

   अ) बाह्य (परकीय) आक्रमण     

   ब) अंतर्गत कलह

   क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश    

  ड) आर्थिक कलह


   1) अ, ब, क   

   2) अ, क, ड 

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, ड

 

उत्तर :- 2


६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा  समावेश असतो.

   1) फक्त लोकसभा    

   2) फक्त राज्यसभा    

   3) लोकसभा व राज्यसभा   

   4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा


उत्तर :- 4


७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

 ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.


   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

   4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.


उत्तर :- 2


८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

   3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

   4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.


उत्तर :- 2


९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

   1) प्रधानमंत्री    

   2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश    

   3) भारताचे उपराष्ट्रपती   

  4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 3


1०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”  राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू    

   2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   3) के. एम. मुन्शी  

   4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर :- 1


1) खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा.

  विद्युत प्रकल्प      जिल्हा

         अ) पवना        i) ठाणे

         ब) तिलारी        ii) सिंधुदुर्ग

         क) भातसा        iii) परभणी

         ड) येलदरी        iv) पुणे

             अ  ब  क  ड

         1)  ii  i  iv  iii

         2)  i  iii  ii  iv

         3)  iv  ii  i  iii

         4)  i  iv  iii  ii


उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

   अ) वर्धा    ब) कोयना    क) उल्हास    ड) सावित्री


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, अ    3) अ, ब, ड, क    4) ड, क, ब, अ


उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ........... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    3) औरंगाबाद    4) सोलापूर


उत्तर :- 2


4) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ............. या विभागात आहे.

   1) विदर्भ    2) कोकण    3) मराठवाडा    4) नाशिक

उत्तर :- 3


5) मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ ..............जिल्ह्यात वसलेला आहे.

   1) गडचिरोली    2) भंडारा    3) अमरावती    4) यवतमाळ


उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...