✍️ यशाचा राजमार्गच्या मताशी खालील दिलेल्या परीक्षा बद्दल माहिती बाबतीत आम्ही सहमत आहोत.. 🙏
मुख्यमंत्र्यांनी पेपर पुन्हा एकदा पुढे ढकलताना मुलांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला आणि कोरोना ही दोन कारणे सांगितली.परंतु मुख्य कारण सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे आरक्षण.आरक्षण या मुद्द्यामुळे पेपर पुढे ढकलण्यात आले ही वस्तुस्थिती आहे.तर आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवडे पुढे ढकलली आहे.म्हणजेच नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होईल.आणि आरक्षणामुळे पेपर पुढे ढकलले आहेत तर आयोगाला निकाल लागेपर्यंत थांबावे लागेल.मग पुढील सुनावणीला निकाल लागेल का ?..पुढील सुनावणी ही खरे पाहता पहिलीच सुनावणी असणार आहे कारण मागील सुनावणीला राज्य सरकारचे वकील अनुपस्थित होते.त्यामुळे सुनावणी झालीच नाही.आरक्षणासारखे मुद्दे एकाच सुनावणीत निकालात निघतील याची शक्यता किती आहे हे सर्वानाच माहीत आहे.आपल्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास नोव्हेंबर मधील सुनावणी जर पुन्हा एकदा पुढे ढकलली तर ती डिसेंबर मधे घ्यावी लागेल आणि डिसेंबर मध्ये समजा आरक्षणाचा निकाल लागला आणि पेपर घेण्याचा मार्ग मोकळा झाला तर पेपर कमीत कमी डिसेंबर end ला ला घ्यावे लागतील आणि मुख्य परीक्षा मार्च एप्रिल ला घ्यावी लागेल.असे झाले तर मग 2021 च्या पूर्व परीक्षा घेणार कधी ? ज्या की दरवर्षी एप्रिल मे मध्ये होतात... Practically पाहता यावर्षीची परीक्षा डिसेंबर मध्ये चालू करून पुन्हा पुढील वर्षाची परीक्षा एप्रिल मध्ये चालू करणे याची शक्यता कमी वाटत आहे...वरील गोष्टींना अनुसरून माझी काही मते सांगत आहे ही माझी वैयक्तिक मते आहेत.
👉काही रिक्त पदे add करून 2020 ची Ad हीच 2021 ची Ad म्हणून परीक्षा घेतली जाऊ शकते.
👉नकतेच Graduation झालेल्या विद्यार्थ्यांना 2021 चा फॉर्म भरण्याची संधी दिली जाऊ शकते.
👉पपर फेब्रुवारी अथवा एप्रिल ला होऊ शकतात.
👉मख्य परीक्षेला नेहमीप्रमाणे पुरेसा वेळ दिला जाऊ शकतो.
👉वर्ग ३ तसेच वनसेवा यांच्या परीक्षा ही 2021 मध्ये घेतल्या जाऊ शकतात.पदे कमी काढतील परंतु पेपर नक्कीच घेतील.
👉आरक्षणाच्या मुद्द्यावर जरी न्यायालयात निर्णय लवकर नाही होऊ शकला तरी त्यावर नक्कीच तोडगा काढला जाईल आणि परीक्षेचा मार्ग मोकळा होईल.
👉2021 मध्ये परीक्षा होणार हे मात्र 100% खरे.
👉 समजा वरील सर्व गोष्टी खोट्या ठरवत आयोगाने याच वर्षी पेपर घेतले तर माझ्या मते किमान December च्या शेवटच्या आठवड्या आधी पेपर घेण्याची शक्यता कमी आहे.त्यानंतर पेपर घेतले तर ते केवळ रविवारीच होतील या भ्रमात राहू नका. कोणत्याही दिवशी घेऊ शकतात.
👉एवढ सांगण्याचा कारण हेच की आपल्याकडे किती वेळ आहे याप्रमाणे आपल्या अभ्यासाचा नियोजन करावे.
👉परत्येकाची जशी काही Prediction असतात तसेच माझेही आहे.यात कोणालाही Demotivate करण्याचा उद्देश नाहीये केवळ अभ्यासाला एक दिशा मिळावी हाच उद्देश आहे.कदाचित वरील सर्व Prediction खोटीही ठरू शकतात कारण शेवटी परिस्थितीनुसार काय निर्णय घ्यायचा ते आयोग आणि सरकार घेणार आहे.
👉परत्येकाला परीक्षा कधी होतील हे गृहीत धरूनच अभ्यास करावा लागेल अन्यथा अभ्यासाला दिशा मिळणार नाही.
👉शवटी पुन्हा एकदा सांगत आहे आरक्षणाचा निकाल जरी प्रलंबित राहिला तरी त्यावर काहीतरी तोडगा काढून परीक्षा या 100% होतीलच.
(वरील सर्व मते ही माझी वैयक्तिक मते आहेत.याला कोणतीही अफवा अथवा अधिकृत समजू नये.खूप विद्यार्थी याबाबत विचारात असल्याने केवळ एक Prediction केले आहे)
No comments:
Post a Comment