1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.
1) बालाघाट 2) महादेव 3) सातपुडा 4) अजिंठा
उत्तर :- 1
2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?
1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा 2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा
3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना 4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा
उत्तर :- 1
3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.
ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.
क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.
ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.
1) ब 2) क 3) ड 4) कोणतेही नाही
उत्तर :- 4
4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?
1) गोदावरी 2) भीमा 3) कृष्णा 4) वरील एकही नाही
उत्तर :- 2
5) योग्य जोडया लावा.
धबधबे ठिकाण
अ) मार्लेश्वर i) सातारा
ब) ठोसेघर ii) रत्नागिरी
क) सौताडा iii) अहमदनगर
ड) रंधा iv) बीड
अ ब क ड
1) ii iii i iv
2) iv iii ii i
3) i iv iii ii
4) ii i iv iii
उत्तर :- 4
1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
1) तापी 2) वैनगंगा 3) नर्मदा 4) कृष्णा
उत्तर :- 2
7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?
अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.
ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.
1) केवळ अ योग्य 2) केवळ ब योग्य 3) अ व ब दोन्ही योग्य 4) अ व ब योग्य नाहीत
उत्तर :- 2
8) जोडया लावा.
जिल्हा धबधबा
अ) अहमदनगर i) सौताडा धबधबा
ब) अमरावती ii) सहस्त्रकुंड धबधबा
क) बीड iii) रंधा धबधबा
ड) यवतमाळ iv) मुक्तागिरी धबधबा
अ ब क ड
1) ii iii iv i
2) i iv iii ii
3) iii iv i ii
4) iv ii iii i
उत्तर :- 3
9) खालील विधाने पहा.
अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.
ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.
क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.
1) विधान अ आणि ब बरोबर आहेत. 2) विधान अ आणि क बरोबर आहेत.
3) विधान ब आणि क बरोबर आहेत. 4) सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4
10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?
1) पूर्णा 2) पांझरा 3) दुधना 4) गिरणा
उत्तर :- 3
1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
अ) कृषक प्रजा पक्ष ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन
क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्ष
1) फक्त अ, क, ड 2) फक्त ब, क, ड 3) फक्त अ, ब, ड 4) फक्त अ, ब, क
उत्तर :- 4
2) खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.
ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.
क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) अ आणि ब 2) ब आणि क 3) अ आणि क 4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
3) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?
अ) समतेचे तत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) संघराज्य ड) सार्वभौमत्व
1) अ, ब, क, ड 2) ब, क, ड 3) अ, ब, क 4) अ, ड, क
उत्तर :- 1
4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.
2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.
3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.
4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.
उत्तर :- 4
5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?
अ) राज्ये अविनाशी नाहीत. ब) आणीबाणी तरतूदी
क) अखिल भारतीय सेवा ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार
1) अ, ब, क, ड 2) ब, क, ड, इ 3) अ, ब, क, इ 4) ब, क, इ
उत्तर :- 3
6) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्यांक उपसमिती
क) सल्लागार समिती ड) राज्ये समिती
1) फक्त अ, ब, क 2) फक्त ब, क, ड 3) फक्त अ, ब, ड 4) फक्त अ, क, ड
उत्तर :- 1
7) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?
1) के. सी. व्हिअर 2) आयव्हर जेनिंग्ज 3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन 4) मॉरिस जोन्स
उत्तर :- 4
8) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?
1) एक राज्यघटना 2) व्दिगृही कायदेमंडळ
3) राज्यघटनेची सर्वोच्चता 4) न्यायालयीन पुनर्विलोकन
उत्तर :- 1
9) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
1) स्वातंत्र्य 2) समता 3) न्याय 4) बंधुभाव
उत्तर :- 3
10) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या ............. घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.
1) 44 वी 2) 41 वी 3) 42 वी 4) 46 वी
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment