Sunday, 8 November 2020

वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक (MPSC)



राष्ट्रीय विकासात बँकांची भूमिका


बँक या शब्दाची उत्पत्ती बँको (Banco) या इटालियन तसेच जर्मन शब्द (Banck) या शब्दापासून झाली आहे. बँकिंग कंपनी (नियमन कायदा) १९४९ अन्वये बँक म्हणजे अशी संस्था होय. जी अग्रीमे देण्यासाठी अगर गुंतवणूकीसाठी व चेक्स, ड्राफ्टस, ऑर्डर, अगर इतर प्रकारे मागणी करताच परत देण्याच्या अटीवर ठेवी स्विकारते.


भारतात सावकार, सराफ, पेढीवाले या स्वरुपात बँक वयवसाय फार पुरातन काळापासून प्रचलित आहे.


आधुनिक बॅक व्यवसाय: – अशा प्रकारचा बँक व्यवसाय भारतात १७७० मध्ये आलेक्झांडर आणि कंपनीद्वारे स्थापन झालेल्या बँक ऑफ हिंदुस्थानच्या स्थापनेने झाला.


व्याख्या: – जी संस्था कर्ज देण्यासाठी अथवा भंडवल गुंतवणूकीसाठी लोकांकडून त्यांनी मागताक्षणी परत देण्याच्या किंवा चेक, ड्राफ्ट, ऑर्डर अथवा इतर प्रकारे परत देण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारते ती संस्था म्हणजे बँक होय.


धनादेश:– भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियमानुसार धनादेश म्हणजे मागणी केल्यावर व देय असलेली, निश्चित अशा बँकेवर काढलेली हुंडी होय.


धनादेशाचे प्रकार:–


१. साधा धनादेश:– जो धनादेश रेखांकित केलेला नसतो त्यास साधा धनादेश म्हणतात. साध्यास धनादेशाचे  अ) वाहक धनादेश आणि  २) आदेश धनादेश असे दोन प्रकार पडतात.


अ) वाहक धनादेश:– वाहक धनादेश म्हणजे धनदेश बॅंकेत सादर करणा-या कोणत्याही व्यक्तीस त्याचे पैसे त्वरीत मिळू शकतात. त्यामुळे हा धनादेश धोकादायक आहे.


आ)वाहक धनादेश (Bearer Cheqye):– वाहक धनादेश म्हणजे धनादेश बँकेत सादर करणा-या कोणत्याही व्यक्तीस त्याचे पैसे त्वरीत मिळू शकतात. त्यामुळे हा धनादेश धोकादायक आहे. 


इ) आदेश धनादेश:– या प्रकारच्या धनादेशाचे पैसे ज्याचे धनादेशावर नाव लिहिलेले आहे त्या व्यक्तिलाच मिळतात. जर त्या व्यक्तीने धनादेश दुस-या व्यक्तीला दिला तर त्या व्यक्तीला धनादेशाच्या मागच्या बाजूस दुस-या व्यक्तीचे नाव लिहून स्वतःची सही करावी लागते यास पृष्ठांकन असे म्हणतात. हा धनादेश सुरक्षित प्रकारचा आहे.


२. रेखांकित धनादेश:– या धनादेशाचे पैसे धनादेश बँकेत सादर करताच त्वरीत मिळत नाही तर, ज्या व्यक्तीचे धनादेशावर नाव आहे त्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे जमा होतात. हा धनादेशाचा सुरक्षित प्रकार आहे. त्यामुळे हा धनादेश गहाळ झाला तर त्याचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले ते समजू शकते. या धनादेशाच्या रेखांकनाचे पुढील प्रकार पाडतात.


अ) सर्वसाधारण रेखांकन:- जेव्हा धनादेशावर डाव्या बाजूस दोन तिरप्या रेषा काढून त्यामध्ये ऍन्ड कं. असे लिहिले जाते त्या रेखांकनास सर्वसाधारण रेखांकन असे म्हटले जाते. या धनादेशाचे पैसे रोख न मिळता त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होतात. या धनादेशाचे पैसे व्यक्तीचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेमार्फत मिळू शकतात.


आ) विशिष्ट रेखांकन:– जेव्हा धनादेशावर डाव्या बाजूस दोन तिरप्या रेषा काढून त्यामध्ये विशिष्ट बँकेचे अथवा विशिष्ट शाखेचे नाव लिहिलेले असते त्या रेखांकनास विशिष्ट रेखांकन असे म्हणतात या धनादेशाचे पैसे त्यावर ज्या बँकेचे अथवा शाखेचे नाव लिहिले आहे त्या शाखे मार्फतच मिळू शकतात.


इ) चलन क्षमता नष्ट करणारे रेखांकन: – या प्रकारच्या धनादेशावर दोन समांतर रेषामध्ये अहस्तांतरणीय (Not Negotiable) असे लिहिलेले असते.


रेखांकन: – भारतातील चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम १२३ अन्वये धनादेशावर दोन समांतर तिरप्या रेषा काढण्याच्या आणि त्यात अँन्ड कंपनी किंवा इतर शब्द लिहिण्याच्या प्रक्रियेस रेखांकन असे म्हणतात.


वैशिष्ट्ये:  –


१.     धनादेशाच्या डाव्या बाजूकडील कोप-यात तिरप्या दोन समांतर रेषा काढणे. 


२.     दोन समांतर रेषांच्या मध्ये अँन्ड कंपनी किंवा इतर शब्द लिहिणे.


३.     दोन समांतर रेषांमध्ये अपरक्राम्य हा शब्द लिहिणे किंवा न लिहिणे.


रेखांकनाचे महत्व:  –


१.     धनादेशाचे प्रदान अनाधिकृत व्यक्तीला होत नाही.


२.     धनादेशाचे प्रदान सुरक्षित पणे केले जाते.


३.     धनादेशाचे प्रदान कोणाला मिळाले याचा शोध सहजपणे घेता येतो.


४.     धनादेशाचा वापर सुरक्षितपणे करता येतो.


रेखांकन कोण करु शकते:  –


१. धनादेशाचा आदेशक: - बँक ग्राहक किंवा खातेदार आपली देणी फेडण्यासाठी धनादेशाचा वापर करीत असतो. तेव्हा धनादेश काढतांनाच आदेशक या नात्याने त्याला धनादेशावर रेखांकन करता येते. तसेच आदेशकाला धनादेशावर सर्वसाधारण, विशेष किंवा मर्यादित रेखांकन करता येते.


२. धनादेशाचा धारक: – धनादेशाचा धारक त्यावर पुढील प्रकारे रेखांकन करु शकतो.


अ) धनादेशावर रेखांकन नसल्यास त्यावर सर्वसाधारण किंवा विशेष रेखांकन धारकाला करता येते.


आ)  धनादेशावर सर्वसाधारण रेखांकन असल्यास त्यावर विशेष रेखांकन करता येते.


इ)     सर्वसाधारण किंवा विशेष रेखांकन असल्यास त्यावर अपरक्राम्य हा शब्द लिहीता येतो.


ई)     धनादेशावर विशेष रेखांकन असल्यावर एखाद्या बँकेचे नाव लिहून धनादेशाचे पुनर्रेखांकन करता येते.


धानादेश रेखांकन मुक्त करणे: - धनादेशावरील रेखांकन रद्द करण्याच्या प्रक्रियेस धनादेश रेखांकन मुक्त करणे म्हणतात. धनादेश रेखांकन मुक्त केल्यास त्या धनादेशाचे प्रदान बँकेत सादर करताच धारकास करणे म्हणतात. धनादेश रेखांकन मुक्त केल्यास त्या धनादेशाचे प्रदान बँकेत सादर करताच धरकास रोख रक्कम मिळविता येते. परंतु धनादेश रेखांकन मुक्त करण्याचा अधिकार केवळ धनादेशाच्या आदेशकालाच आहे. धनादेशाच्या आदेशकाने रेखांकनाच्या ठिकाणी रेखांकन रद्द असे लिहिल्यास आणि स्वतःची सही केल्यास रेखांकन रद्द होते.


भारतीय बँकिंग क्षेत्राचा विकास


भारतात बुध्द काळात श्रेष्ठी म्हणजे तत्कालीन बँकाच होय.


कौटिल्याने सुद्धा व्याज दराचा उल्लेख केला आहे.


मोगल काळात धातू चलन बँक व्यवसाय भरभराटीस आला परंतु शास्त्रीय पध्दत नव्हती.


अठराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचा बँकिंग व्यवसाय सुरु केला. कंपनी मुंबई आणि कोलकाता येथे एजन्सी हाउसची स्थापना केली. परंतु त्यांना स्वतःचे भांडवल नव्हते.


भारतातील प्रथम बँक युरोपीयन बँकिंग पध्दतीवर आधारीत विदेशी भांडवलाच्या आधारे अँलेक्झांडर अँन्ड कंपनीद्वारे १७७० मध्ये कोलकाता येथे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना करण्यात आली.


१७८८ मध्ये बेंगॉल बँक व जनरल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.


खाजगी भागधारकांनी एकत्र येवून १८०६ मध्ये बँक ऑफ बेंगॉल, १८४० मध्ये बँक ऑफ मुंबई, १८४३ मध्ये बँक ऑफ मद्रास या तीन इलाखा बँकांची स्थापना करण्यात आली.


१८६५ साली अलाहाबाद बँक


१८८१ अलायन्स बँक ऑफ शिमला


१९०१ पिपल्स बँक ऑफ इंडिया


भारतीय लोकांनी संचलित केलेली प्रथम बँक म्हणजे १८८१ मध्ये स्थापन झालेली अवध कमर्शियल बँक होय.


१८९४ मध्ये स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक ही पुर्णरुपाने प्रथम भारतीय बँक होय. सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी बँक पंजाब नॅशनल बँकच होय.


१९ व्या शतकाच्या तुलनेने २० शतकात प्रामुख्याने १९०६ नंतर भारतीय बँकाचा


१९१७ मध्ये उद्योजकांना उद्योगासाठी वित्तीय मदत करण्यासाठी टाटा औद्योगिक बँकेची स्थापना करण्यात आली.


शेड्यूल्ड व्यापारी बँक (अनुसूचीत बँक):- ज्या बँकांचा सामावेश आरबीआयच्या कायद्याच्या दुस-यावर सूचीत केला जातो व व्यापारी बँकांच्या मुदती ठेवी ५ लाखाच्या वर 


वरील माहिती ज्ञानसागर अंतर्गत वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक (MPSC) यात विस्तृतपणे दिलेली आहे.

No comments:

Post a Comment