04 नोव्हेंबर 2020
⚓️ सहभागी देश :
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
⚓️ ठिकाण :
बंगालचा उपसागर, अरबी समुद्र
⚓️ कालावधी :
हा सराव दोन टप्प्यात होईल.
- पहिला टप्पा विशाखापट्टणममध्ये ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या काळात होणार आहे.
- दुसरा टप्पा नोव्हेंबरच्या मध्यात अरबी समुद्रात प्रस्तावित आहे.
⚓️ उद्देश :
प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.
⚓️ पार्श्वभूमी :
- क्वाड सदस्य देशांमध्ये भविष्यात लष्करी सहकार्य राहावे याचा प्रयत्न म्हणून या कवायतींकडे पाहिले जात आहे.
- जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचेही अनेक वादग्रस्त प्रश्नांवरून चीनशी संबंध ताणले गेले आहेत.
- इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढणारा प्रभाव हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेचा मुद्दा आहे.
- या कवायतींमध्ये सहभाग घेतलेले देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संरक्षणविषयक सहकार्य करण्यास बांधील आहेत हे यावरून स्पष्ट होते
⚓️ विशेष :
- यंदाच्या मलबार युद्ध सरावाचं विशेष महत्त्व म्हणजे १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया या सरावात पुनरागमन करत आहे.
- करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चार देशातील हा नौदलाच्या युद्ध सरावात कुठलाही प्रत्यक्ष संपर्क नसेल.
No comments:
Post a Comment