Monday, 30 November 2020

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या GDP दरात 7.5 टक्क्यांची घट



🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 टक्क्यांची घट झाली.


🔰चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत GDP दरात 23.9 टक्क्यांची घट झाली होती. मागील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आकुंचन झाल्यानंतर लक्षणीय सुधारणा झाली आहे.


🔴सथूल देशांतर्गत उत्पादन (GDP) विषयी...


🔰उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातले वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातला एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातले किंवा कालखंडातले ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.


🔰एकूण राष्ट्रीय उत्पादन दोन घटकांचे बनलेले असते. त्यांपैकी पहिला व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवाकर्मे, ज्याला ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन’ (GDP) असे म्हणतात. ‘GDP’मधून भांडवली वस्तूंची झीज वजा केली म्हणजे ‘निव्वळ देशांतर्गत उत्पादन’ (NDP) मिळते. ‘एकूण राष्ट्रीय उत्पादन’चा दुसरा घटक म्हणजे देशातील रहिवाशांना त्यांच्या परदेशांतल्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न वजा परदेशांतल्या रहिवाशांना देशातल्या त्यांच्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न, ज्याला परदेशातून प्राप्त होणारे निव्वळ घटक उत्पन्न असे म्हणतात.


🔰राष्ट्रीय उत्पन्नाची जगातली पहिली परिगणना 1665 साली इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी यांनी केली.भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी 1876 साली 1867-68 या वर्षासाठी केली.

No comments:

Post a Comment