Thursday, 26 November 2020

चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.


🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यानाने दक्षिणेकडील हैनान प्रांतात वेंगचँग अवकाशयान उड्डाण तळावरून यशस्वी झेप घेतल्याची माहिती सीजीटीएन या संस्थेने दिली आहे.


🔰तर हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता अवकाशात झेपावले.

चँग इ- 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्रमोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.


🔰तसेच अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले जाणार असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...