Monday, 2 November 2020

दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत-



📚आतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात हा चित्रपट कॅनडाचे प्रतिनिधित्व करणार आहे


📚या वर्गवारीसाठी दीपा मेहता यांना दुसऱ्यांदा संधई मिळत आहे. १५ मार्चला ऑस्करची नामांकने जाहीर होणार आहेत. पुरस्कारप्रदान कार्यक्रम २५ एप्रिलला होणार आहे.


📚महता यांच्या ‘वॉटर’ या चित्रपटास २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्गात नामांकन मिळाले होते. ‘अर्थ’, ‘फायर’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले इतर दोन चित्रपट होते.


📚‘फनी बॉय’ हा चित्रपट श्याम सेल्वादुराई यांच्या १९९४ मधील कादंबरीवर बेतलेला आहे. ही घटना १९७० ते १९८० दरम्यान श्रीलंकेत घडलेली दाखवली आहे. अरजी या तरुणाच्या लैंगिक जाणिवा वेगळ्या असतात ते यात दाखवले असून तामिळ व सिंहली यांच्यातील संघर्षांच्या काळात हा वयात आलेला मुलगा सामाजिक व कौटुंबिक र्निबध झुगारुन देतो.


📚दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा २००७ मधील ‘वॉटर’ प्रमाणेच ठोस मांडणी घेऊन आलेला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट गटात नामांकन मिळाले असल्याचे टेलेफिल्म कॅनडाच्या कार्यकारी संचालक ख्रिस्ता डिकेनसन यांनी सांगितले.

मेहता यांचे बालपण दिल्लीत गेले असून त्या सध्या टोरांटोत चित्रपट निर्मात्या आहेत. 


📚‘फनी बॉय’ हा माझ्यासाठी मानवता व आशा यांचा संगम आहे. जगात सर्वसमावेशकतेचा ध्वज फडकवत ठेवण्याचा प्रयत्न त्यात आहे. डेव्हीड हॅमिल्टन व मी कॅनडातील परीक्षकांचे या निवडबद्दल आभारी आहोत, असे त्यांनी सांगितले.


📚हा चित्रपटाची कथा मेहता व सेल्वादुराई यांनी लिहिली आहे. हॉलिवूडच्या अवा ज्युवेर्नाय यांच्या अ‍ॅरे रिलिजींगने हा चित्रपट घेतला होता. तो काही निवडक शहरांत दाखवला जाणार असून १० डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...