Friday, 27 November 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट




१८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म (१४ एप्रिल)

१९०७ मँट्रीक परीक्षा पास

१९०७ रमाबाई वलंगकर सोबत मंगल परिणय 

१९१० इन्टरमीडिएट परीक्षा पास

१९१२ BA परीक्षा पास

१९१३ उच्च शिक्षणाकरिता न्युयॉर्क ला रवाना 

१९१५ अँन्शंट इंडियन काँमर्स या प्रबंधावर MA ची उपाधी 

१९१६ Ph d पदवी बहाल 

१९१८ सिडेनहँम काँलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती (११ नोव्हेंबर)

१९२० राजश्री शाहू यांच्या साहाय्याने 'मुकनायक'चा पहिला अंक (३१ जानेवारी)

१९२२ बॅरिस्टरची परीक्षा पास

१९२३ डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल 

१९२४ बहिष्कृत हितकारणी सभा ची स्थापन मुंबई (२० जुलै)

१९२७ बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन (३ एप्रिल)

१९२७ मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती 

१९२७ महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर)

१९२८ समता पाक्षिकाचा आरंभ (२९ जून)

१९३० काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह प्रारंभ (३ मार्च)

१९३० लंडन येथे गोलमेज परिषदे साठी मुंबईहून रवाना (२ ऑक्टोबर)

१९३० जनता साप्ताहिकाचा आरंभ (२४ नोव्हेंबर)

१९३१ मनीभवण मुंबई येथे गांधी सोबत पहिली भेट (१४ ऑगस्ट)

१९३१ अल्पसंख्याकाच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध (८ ऑक्टोबर)

१९३१ गांधी-आंबेडकर-पंचम जाँर्ज यांची भेट (२६ नोव्हेंबर)

१९३२ पुणे करारावर स्वाक्षरी (२५ सप्टेंबर)

१९३५ मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती (२ जून)

१९३५"हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" डाँ आंबेडकराची धर्मातराची घोषणा, येवला (१३ ऑक्टोबर)

१९३६ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना (१५ ऑगस्ट)

१९३७ मुंबई असेंब्ली निवडणूक डाँ आंबेडकर विजयी (१७ फेब्रुवारी)

१९४२ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना (१७ एप्रिल)

१९४२ मजूर मंत्री म्हणून नियुक्ती

१९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना (२० जून)

१९४७ भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून नियुक्ती (२९ ऑगस्ट)

१९४७ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती (२९ ऑगस्ट)

१९४८ बाबासाहेब यांचा दुसरा परिणय (१५ एप्रिल)

१९४९ घटना समितीने घटना स्विकार केली (२६ नोव्हेंबर)

१९५० औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना (१९ जून)

१९५१ हीन्दु कोड बिल व मागास वर्गीयाच्या आरक्षणा बाबत मंत्री परिषदेचा राजीनामा (२७ सप्टेंबर)

१९५२ प्रथम सार्वत्रिक निवडणूक मध्ये पराभव (जानेवारी)

१९५२ राज्य सभेसाठी निवड (मार्च)

१९५२ कोलंबिया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लाँ पदवी बहाल (५ जून)

१९५३ हैद्राबाद उस्मानीया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लीटरेचर पदवी बहाल (१२ जानेवारी)

१९५४ भंडारा पोट निवडणूकी मध्ये पराभव (मे)

१९५५ भारतीय बौद्ध महासभेची स्थापना (४ मे)

१९५६ नरेपार्क येथे आँक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा (२४ मे)

१९५६ नागपुरात पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमनी यांच्या हस्ते पत्नी सोबत धम्म दीक्षा घेतली व नंतर ५ लाख अस्पृश बांधवाना बौद्ध धम्माची दीक्षा दिली (१४ ऑक्टोबर)

१९५६ चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश बांधवाना धम्म दीक्षा दिली (१६ ऑक्टोबर)

१९५६ दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (६ डिसेंबर)

१९५६ मुंबई येथे दादर चौपाटीवर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार (७ डिसेंबर)

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...