- वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
- वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.
- सॅम्यूएल्स डिसेंबर २०१८मध्ये अखेरचा सामना खेळला असून त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जून महिन्यातच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला होता. मंडळाचे अध्यक्ष जॉनी ग्रेव्ह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- ३९ वर्षीय सॅम्यूएल्सने ७९ कसोटी, २०७ एकदिवसीय आणि ६७ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ११ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या असून १५० बळीही मिळवले आहेत.
- २०१२ आणि २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या होत्या.
- २०१२मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध ५६ चेंडूंत ७८ धावा फटकावल्या होत्या. चार वर्षांनंतर त्याने ६६ चेंडूंत ८५ धावांची खेळी करत विंडीजला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला होता.
No comments:
Post a Comment