Friday 27 November 2020

बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा.

  


🔶अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.


🔶कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, अमेरिकेशी कॅनडाचे निकटचे संबंध आहेतच,  भौगौलिक स्थिती व व्यक्तिगत संबंध यामुळे दोन्ही देशांत आर्थिक संबंध मजबूत आहेत. कोविड १९ साथीचा मुकाबला, शांतता व सर्वसमावेशकता, आर्थिक भरभराट, हवामान बदल या मुद्दय़ांवर नवीन प्रशासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हे दोन्ही  देश एकत्रितपणे जागतिक आव्हानांना तोंड देतील.


🔶ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, अमेरिका हा आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. सामुदायिक अग्रक्रमांच्या मुद्दय़ांवर आम्ही काम करू. त्यात हवामान बदल, व्यापार व सुरक्षा यांचा समावेश आहे.


🔶ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बायडेन यांच्याकडून नव्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली असून नवीन अध्यक्षांची निवड ही अमेरिकेसाठीच नव्हे तर आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment