Tuesday, 24 November 2020

सर्वाधिक अंधश्रद्धा वैद्यकीय क्षेत्रात’


🎍दशात धर्माच्या खालोखाल सर्वात जास्त अंधश्रद्धा या वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अंधश्रद्धा रोखणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.


🎍आरोग्य या विषयासाठी वाहिलेल्या ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी विरारमध्ये झाले. विरार येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी हे संपादक असलेल्या या दिवाळी अंकाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.


🎍सरक्षण आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून कुबेर म्हणाले,‘ वैद्यकीय क्षेत्रातील अंधश्रद्धेमुळे अनारोग्य तयार झाले तितके औषध कंपन्यांमुळे झालेले नाही. ऐकीव माहितीवर नखांवर नख घासणे, स्मरणशक्ती वाढविणारी औषधे घेणाऱ्यांच्या संख्येवरूनच या अंधश्रद्धांची कल्पना करता येईल.’


🎍अफवांचा बुडबुडा विचारांच्या टाचणीने फोडता येऊ शकतो. पण, नवीन प्रश्न विचारण्याची लोकांमधील जाणीवच हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. समूहाचे मानसशास्त्र अफवांवर आहे. अशा वेळी जनजागृती करणे हे कठीण काम असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment