Tuesday, 24 November 2020

डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला बुकर पुरस्कार


⚡️ गलासगो शहरातील १९८० च्या दशकातील निम्नमध्यमवर्गीय जगणे केंद्रभागी करणाऱ्या स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला. त्यांची ही पदार्पणातील कादंबरी आहे.


💁‍♂️ सटुअर्ट यांनी स्कॉटलंडमधील बालपण आत्मकथेऐवजी कादंबरीच्या रुपात समोर आणले. उपजीविकेसाठी वस्रोद्योगात असलेल्या या लेखकाने ग्लासगो शहर आणि त्या भवतीच्या उपनगरांचे पर्यटन ‘शगी बेन’मधून घडविले. 


✒️ तिथल्या माणसांइतक्याच कुरूप बनलेल्या शहरांचे हे तिथल्या साहित्य किंवा पत्रकारितेतूनही अधोरेखित न झालेले सूक्ष्म अवलोकन आहे. 


💫 दबईस्थित भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांचे नाव अंतिम सहा लेखकात होते, मात्र त्यांच्या ‘बन्र्ट शुगर’ या कादंबरीला बुकरचा मान मिळाला नाही. 


👉 झिम्बाब्वेचे लेखक त्सित्सी दांगारेम्ब्वा यांची ‘धिस मोर्नेबल बॉडी’, डायन कुक यांची ‘दी विल्डरनेस’, माझा मेंगिस्टे यांची ‘दी शॅडो किंग’, ब्रँडन टेलर यांची ‘रिअल लाइफ’ या कादंबऱ्या शर्यतीत होत्या. 


📌 सटुअर्ट यांनी कादंबरी आपल्या आईला अर्पण केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...