Saturday, 14 November 2020

'प्लाझ्मा जेट'चा शोध; ३० सेकंदात होणार कोरोनाचा खात्मा


⚡️ कोरोना संकटातून लवकर मुक्तता होण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


💁‍♂️ अनेक देशांमध्ये या लसींची चाचणी देखील सुरु आहे. त्यातील काही लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. हे संशोधन सुरु असतानाच वैज्ञानिकांनी कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याची क्षमता प्लाझ्मा जेटमध्ये असल्याचा दावा केला आहे.


👉 अवघ्या ३० सेकंदांमध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने कोरोना विषाणूचा खात्मा होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.


💫 अमेरिकेतील लॉस एन्जलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने धातू, चामडे आणि प्लास्टिकवर असणारा कोरोना अवघ्या ३० सेकंदांमध्ये नष्ट करता येतो.


🎉 थरी-डी प्रिंटरच्या मदतीने हा प्लाझ्मा जेट संशोधकांनी तयार केला आहे. या प्लाझ्मा जेटची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.


👀 पलाझ्मा जेटचा स्प्रे संशोधनामध्ये प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि चामड्यावर मारण्यात आला. कोरोनाचा विषाणू हा यामध्ये तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये नष्ट करण्यात यश आल्याचे दिसून आले.


📌 बहुतांश विषाणू हे ३० सेकंदांमध्ये नष्ट झाले. यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल फिजिक्स ऑफ फ्लुएड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

No comments:

Post a Comment