Saturday, 14 November 2020

भारताचा पहिला अनेक खेड्यांसाठीचा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा एकात्मिक पाणीपुरवठा प्रकल्प अरुणाचल प्रदेशात उभारला


अरुणाचल प्रदेशात भारताचा पहिला अनेक खेड्यांसाठीचा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा एकात्मिक पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आला आहे.


‼️ठळक बाबी


अरुणाचल प्रदेशाच्या लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील्या 39 खेड्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

17,480 लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रकल्प संरचीत केलेला आहे.


प्रकल्प 28.50 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. प्रकल्पात पिण्याचे पाणी, हरित ऊर्जा आणि पर्यटन अश्या घटकांसह हा एकात्मिक प्रकल्प म्हणून तयार केला गेला आहे.


व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जसे की एनर्जी-सोलर ग्रिड, SCADA ऑटोमेशन सिस्टम, प्री-फॅब्रिकेटेड झिंक अलम स्टोरेज टाकी, यांचा वापर केला गेला आहे.


प्रकल्पामध्ये स्विमिंग पूल, अ‍ॅम्फीथिएटर, कारंजे आणि बसण्याची व्यवस्था अश्या सोयी उभारून त्याला एक मनोरंजनाचे स्थळ म्हणून स्वरूप देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...