Saturday, 11 May 2024

राज्यसेवा प्रश्नसंच

 १) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

   1) 84 वी घटना दुरुस्ती  

   2) 85 वी घटना दुरस्ती

   3) 86 वी घटना दुरुस्ती  

   4) 87 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?

   अ) कायद्यासमोर समानता   

   ब) अस्पृश्यतेची समाप्ती

   क) पदव्यांची समाप्ती   

   ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य


   1) अ, ब, ड    

  2) अ, क, ड  

  3) क, अ, ब  

  4) ब, ड, क


उत्तर :- 3


३) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.

   ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.

  क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.

    वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?


   1) अ आणि ब  

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


४) मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............

     ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.

   1) सीडॉ (CEDAW) 

   2) युएनडीपी (UNDP)

   3) सीइसीएसआर (CECSR)  

   4) युएनसीएचआर (UNCHR)


उत्तर :- 1


५) योग्य कथन / कथने ओळखा :

   अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

   ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.

 1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे      2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर

   3) दोन्ही कथने अ आणि ब  बरोबर आहेत    

 4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा, व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

   अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.


   ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल.

  क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.

 ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.


   1) अ, ब   

  2) क, ड     

  3) अ, ब, क   

  4) अ, ब, क, ड


उत्तर :- 3


७) योग्य कथन / कथने ओळखा.

 अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.

   ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.


   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे   

   2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर 

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर 

   4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची


उत्तर :- 3


८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

   अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

  ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू शकते.

   क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

   ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या 

       वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

   1) अ, ब  

   2) अ, ड  

    3) अ, ब, क, ड    

   4) अ


उत्तर :- 4


९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरू  

   2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) सरदार वल्लभभाई पटेल   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


१०) कालानुक्रमे मांडणी करा:

   अ) अंतर्गत सुरक्षा कायदा   

   ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा

   क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा 

   ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा


   1) ब, अ, ड, क   

   2) अ, ब, क, ड  

   3) क, ड, अ, ब   

   4) ब, ड, क, अ


उत्तर :- 1


२२५१)  खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    
   2) लोकसंख्या वाढ
   3) बेरोजगारीत वाढ    
  4) प्रशासकीय खर्चात वाढ

    उत्तर :- 3

२२५२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना    
   2) समन्वित किंमत रचना
   3) 1 व 2 दोन्ही    
   4) कोणतेही नाही

    उत्तर :- 3

२२५३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............
      टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के 
   2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
  4) 45 टक्के

   उत्तर :- 3

२२५४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही. 
    2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.
   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.
   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

    उत्तर :- 2

२२५५) योग्य पर्याय निवडा.
     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ) वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.     .
 ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.
   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक   
   2) वरील सर्व बरोबर    
   3) अ व ब बरोबर   
   4) केवळ क बरोबर

    उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...