Thursday, 5 November 2020

विख्यात पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन

📚मध्य पूर्वेतील वार्ताकनात निष्णात मानले गेलेले प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे नुकतेच डब्लिन येथे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मध्य-पूर्वेतील संघर्षग्रस्त भागात राहून त्यांनी वार्ताकन केले होते.

📚फिस्क यांच्या वार्ताकनाने नेहमीच वादाचे मुद्दे चर्चेला आले. आर्यलडची राजधानी डब्लिन येथे अल्पशा आजारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

📚 त्या काळातील नामवंत पत्रकार अशा शब्दांत दी इंडिपेंडंटने त्यांचा गौरव केला आहे. अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याची अनेकदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांपैकी ते एक होते.

📚११ सप्टेंबर २०११ रोजीच्या हल्लय़ानंतर ते पाकिस्तान अफगाण सीमेवर गेले होते. तेथे अफगाणी शरणार्थीनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
निर्भिडता, तडजोडी न करणे, सत्य शोधण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असणे व वास्तव मांडणे हे आदर्श पत्रकारांकडून अपेक्षित असलेले सर्व गुण त्यांच्यात होते, त्यामुळे ते यशस्वी झाले, असे मत ‘दी इंडिपेंडंट’चे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तियन ब्राउटन यांनी व्यक्त केले.

📚फिस्क यांनी पेटवलेली पत्रकारितेची अग्निशिखा यापुढेही तशीच तेजाळत राहील, असे ते म्हणाले.
इंग्लंडमधील केंट येथे जन्मलेल्या फिस्क यांनी कारकीर्दीची सुरुवात ‘दी संडे एक्स्प्रेस’मधून केली. नंतर ते ‘दी टाइम्स’मध्ये गेले. उत्तर आर्यलड, पोर्तुगाल, मध्य पूर्व या ठिकाणी त्यांनी काम केले. १९७६ मध्ये ते बैरूतमध्ये गेले त्यावेळी तेथे यादवी माजली होती. बैरूतमध्ये असताना त्यांनी मध्य-पूर्वेत बराच प्रवास केला.

📚इराण-इराक युद्ध, अरब—इस्रायल संघर्ष, अल्जिरियातील युद्ध, अफगाणिस्तानातील संघर्ष, सद्दाम हुसेनचे कुवेतमधील आक्रमण नंतर अमेरिकेचे इराकमधील आक्रमण, अरब स्प्रिंग आंदोलन, सीरियातील यादवी युद्ध याचे वार्ताकन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी निलोफर पाझिरा असून त्या चित्रपट निर्मात्या व मानवी हक्क कार्यकर्त्यां आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...