Wednesday 4 November 2020

शाहिर अमर शेख


जन्म : २० ऑक्टोबर, १९१६

निधन :  २९ ऑगस्ट, १९६९


🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर शेख.


🌷 महबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव.


🌷 तयांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात बार्शी येथे झाला. 


🌷 तयांना पहाडी आवाजाची देणगी आणि प्रतिभाही मिळाली होती. आईकडून लोकगीतांचा वारसाही मिळाला होता.


🌷 परिस्थितीमुळे त्यांना लहानपणा पासूनच मालट्रकवर क्‍लिनर तसेच गिरणी कामगार म्हणून कष्टाची कामे करावी लागली होती. 


🌷 सोलापूरच्या गिरणी कामगार संपात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगाची हवा खावी लागली.


🌷 तथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांची गाठ पडली व ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. 


🌷 पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले.


🌷 यथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण  'शाहीर अमर शेख’ असे नामकरण केले.


🌷 अमर शेख 1930-32 च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.


🌷 पर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 


🌷 तयांची खरी ओळख झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीने. 


🌷 तयांची प्रतिभा बहरली व ते डफ घेऊन सभास्थानी आले व सभेचे फड जिंकू लागले, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 


🌷 सवतः कामगार असल्याने सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. 


🌷 सवरचित तसेच इतर कवींच्या रचनांही त्यांनी गायल्या.


🌷 ग. दि. माडगूळकर यांचे “रागरागाने गेला निघून’ हे “वैजयंता’ या चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबध्द केलेले गीत आशा भोसले यांचे बरोबर त्यांनी गायले.


🌷 तयांच्या शाहिरीमधे पोवाडे लोकनाट्य यांचा समावेश असे. 


🌷 चिनी आक्रमणाचे वेळी त्यांनी कार्यक्रम करून लाखो रुपयांचा संरक्षण निधी गोळा करून राष्ट्रकार्यास हातभार लावला.


🌷 तयावेळी “बर्फ पेटला हिमालयाचा’ हे त्यांनी रचलेले व गायलेले गीत खूप गाजले होते.


🌷 तयांची लेखणी प्रसंगानुरूप चालत असे व वर्तमानाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून डफाच्या ठेक्‍यातून आणि बुलंद आवाजातून लोकांच्या काळजाचा ठाव घेत असे.


🌷 आचार्य अत्रे त्यांना “महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत.


🌷 “कलश’ (1958) आणि “धरतीमाता’ (1963) हे त्यांचे काव्यसंग्रह


🌷 “अमरगीत’ (1951) हा गीतसंग्रह आणि “पहिला बळी’ (1951) हे त्यांनी लिहिलेले नाटक. 


🌷 तयांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश असे.


🌷 जया पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो पक्ष त्यांच्या जीवनाचे अखेरीस शेख यांना सोडावा लागला. 


🌷 तयांच्या विविध गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा व मल्लिका यांच्याकडे आला आहे. इंदापूर येथे शेख यांचे अपघाती निधन झाले.

No comments:

Post a Comment