१८ नोव्हेंबर २०२०

अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाण आहे:



🔰 एक अहवाल

‘व्हाईटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया बेस्ड ऑन द सिविल रजिस्ट्रेशन सिस्टम’ अहवालात दिलेल्या आकडेवारीमधून असे दिसून आले आहे की, अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰अरुणाचल प्रदेशात दर एक हजार पुरुषांमागे 1084 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यापाठोपाठ नागालँड (965), मिझोरम (964), केरळ (963) आणि कर्नाटक (957) असा राज्यांचा क्रम लागतो आहे.


🔰मणीपूर राज्यात अत्यंत वाईट स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे. मणीपूरमध्ये दर एक हजार पुरुषांमागे 757 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यावरती लक्षद्वीप (839), दमण व दीव (877), पंजाब (896) आणि गुजरात (896) ही राज्ये आहेत.


🔰राजधानी दिल्लीत स्त्री-पुरुष प्रमाण दर एक हजार पुरुषांमागे 929 एवढे आहे. जम्मू व काश्मीरमध्ये हे प्रमाण 952 एवढे आहे.


🔰2018 साली जन्म नोंदणीचा दर 89.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो 2009 साली 81.3 टक्के होता.सरासरी, जन्म किंवा मृत्यूच्या नोंदणीसाठी विहित कालावधी 21 दिवसांचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...